सुशांतच्या सांगण्यावरून रियाने ८ जूनला घर सोडले होते, असं आतापर्यंत म्हटलं जातंय. तर घर सोडून आनंदी नव्हते, असं रियाने जबाबत म्हटलंय. त्यावेळी सुशांतची बहीण मितु सिंग ही त्याच्या घरी आली होती. या कारणामुळे रियाने सुशांतचं घर सोडल्याचं सोडल्याचं सांगितलं जात होतं. पण आता रिया चक्रवर्तीचं व्हॉट्सअॅप चॅट लीक झालं आहे. आपणच सुशांतला सोडल्याचं तिने चॅटमध्ये म्हटलंय. इतकच नाही तर रिया सुशांतसोबत खूश नव्हती.
महेश भट्ट यांच्या सांगण्यावरून रियाने संबंध तोडले?
सुशांतचे घर ८ जून रोजी सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना मेसेज पाठवला होता. ‘आयशा आता पुढे गेली आहे सर, मनापासून आणि शांततेत. तुमच्यासोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाने माझे डोळे उघडले. तुम्ही माझे एंजेल आहात. तुम्ही तेव्हाही होते आणि अजूनही आहात’, असं रियाने मेसेजमध्ये म्हटलंय. तर रियाच्या या मेसेजवर महेश भट्ट यांनी दिलेली प्रतिक्रिया थक्क करणारी आहे.
आता मागे वळून पाहू नको. आपल्या वडिलांना माझे प्रेम सांग. आता ते खूप आनंदी होतील, असं त्यांनी रियाला मेसेज करून उत्तर दिलं. आता या मेसेजमध्ये महेश भट्ट यांनी रियाच्या वडिलांचा उल्लेख केला आहे. यावरून अभिनेत्रीचे वडीलही या नात्यावर खुश नव्हते. रियाने सुशांतसोबत राहू नये, असं त्यांना वाटत असल्याचं समोर येतंय. पण चॅटबाबत कुणीही दुजोरा दिलेला नाही. व्हायरल चॅटमध्ये रिया सतत महेश भट्ट यांचे आभार मानतेय. भट्ट यांनी आपल्याला खूप मदत केलीय. असं रियाने एका मेसेजमध्ये लिहिलंय. तुम्ही मला पुन्हा मुक्त केलंय. तुम्ही आयुष्यात मला देवासमान आहात, असं रियाने म्हटलंय. तर महेश भट्टही रियाला मुलगी समान असल्याचं म्हणत आहेत. इतकं मोठं धाडसं केलं, असं म्हणत भट्ट यांनी रियाचं कौतुक केलंय.
रियाचे वकील दिशाभूल करत होते?
यासंदर्भात रियाने तिच्या काही मित्रांशीही चर्चा केल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे आता ८ जूनला रियाने सुशांतचं घर का सोडलं? असं काय घडलं होतं? या दिशेने सीबीआयचा तपास होऊ शकतो. पण सुशांतचं घर सोडलं तेव्हा रियाची वेगळीच कहाणी या मेसेजमधून समोर येतेय. पण बर्याच कालावाधीपासून प्रत्येकाने रियाच्या वकिलांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. सुशांतच्या नैराश्यामुळे रिया स्वत: अस्वस्थ होती, असं तिच्या वकीलांकडून सांगण्यात आलं. तिही तणावाचा सामना करत होती. ती सुशांतला सोडण्यास तयार नव्हती, असं सांगितलं गेलं. पण आता रियाने महेश भट्टशी केलेल्या चॅटवरून हे स्पष्ट होतय की ती सुशांतवर खुश नव्हती आणि त्यांनी हे संबंध केवळ महेश भट्टच्या सल्ल्यानुसार संपवलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
Thank you ever so for you article post.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Thank you for publishing this awesome article.