Sand Sale : राज्य सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणं सर्वाधिक वाळू विक्री भंडारा जिल्ह्यात करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यानंतर दुसरा क्रमांक अहमदनगर जिल्ह्याचा आहे.

 

Maharashtra Sand
नव्या वाळू धोरणाद्वारे वाळू विक्री सुरु

हायलाइट्स:

  • ऑनलाइन नोंदणीनंतर रेती उपलब्ध
  • सरकारी धोरणाप्रमाणं वाळू विक्री
  • भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक विक्री
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन वाळू धोरण राबविण्यात येत असून वाळूची सर्वाधिक विक्री व नोंदणी भंडारा जिल्ह्यात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात २ हजार ७३६ नागरिकांनी २० हजार ब्रास वाळुसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी १६ हजार २९३ ब्रास वाळुची विक्री झाली आहे.

नवीन वाळू धोरणानुसार राज्यातील जनतेला आवश्यक असेलेल्या रेतीसाठी ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदणीची सुविधा आहे. यानुसार ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वाहतुकीसाठी सशुल्क सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांना घरपोच वाळू मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात नोंदणी केलेल्या नागरिकांना सुलभपणे वाळू उपलब्ध व्हावी यासाठी चार वाळू विक्री डेपो सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर ५३ हजार २० ब्रास वाळू उपलब्ध असून ४९ हजार २८० ब्रास वाळू ऑनलाइन नोंदणीसाठी उपलब्ध आहे.
भारताचा इंग्लंडचा दौरा जाहीर, पाच कसोटी सामने नेमके कुठे खेळवण्यात येणार जाणून घ्या…
भंडारा जिल्ह्यानंतर राज्यात सर्वाधिक ऑनलाइन नोंदणी अहमदनगर जिल्ह्यात झाली आहे. वाळुसाठी २ हजार २४५ नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली असून त्यांना १५ हजार ८८५ ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यात २५ हजार ९०६ ब्रास वाळू उपलब्ध असून यापैकी २२ हजार २५ ब्रास वाळू ऑनलाइन नोंदणी धारकांसाठी आहे. नागपूर जिल्ह्यात ११ केंद्रावरुन वाळू विक्रीची सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात ४८ हजार ९५० ब्रास वाळुसाठा उपलब्ध असून त्यापैकी ४६ हजार ४६४ ब्रास वाळू ऑनलाइन विक्रीसाठी आहे. ४४४ नागरिकांनी ३ हजार ०६८ ब्रास वाळुची ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी ५८२ ब्रास वाळू घरपोच उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
BCCI अध्यक्षांनी का केला माझा गेम, अंबाती रायुडूने धक्कादायक आरोप करत कारण सांगितलं
वर्धा जिल्ह्यातील ९५३ नागरिकांनी ६ हजार ६१८ ब्रास वाळुची ऑनलाइन नोंदणी केली असून त्यापैकी ३ हजार ५८२ ब्रास वाळू नागरिकांना उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात ७ डेपोमध्ये ४ हजार ३३१ ब्रास वाळुसाठा उपलब्ध आहे. गोंदिया जिल्ह्यात ५ वाळू विक्री केंद्रावर २९ नागरिकांनी २७२ ब्रास वाळुसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ९८ हजार ७६६ ब्रास वाळुचा साठा असून त्यापैकी ऑनलाइन नोंदणीसाठी ९८ हजार ५४४ ब्रास वाळू विक्रीसाठी उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ३८ नागरिकांनी ३६५ ब्रास वाळुसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ३ हजार ६६० ब्रास वाळुसाठा असून ऑनलाइन नोंदणीसाठी ३ हजार ३४५ ब्रास वाळू उपलब्ध आहे.
भारताने नाकारलं तरी अश्विनचं महत्व आयसीसीने दाखवून दिलं, पाहा नेमकं आता घडलं तरी काय…

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here