गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आदिवासी तरुणानं नीट परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. राजू दुर्गम या तरुणानं नीट परीक्षेत यश मिळवत आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. राजूचे आई वडील कधीही शाळेत गेले नाहीत. गावी शेती आणि मजुरी करुन त्यांनी मुलांना शिकवलं. शेती आणि मजुरीतून त्यांना प्रत्येक महिन्याला केवळ सहा हजार रुपये मिळतात. आपल्यासारखं मुलानं देखील गरिबीत जीवन जगू नये यासाठी त्यांनी मुलाला शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. राजू दुर्गमनं आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला आणि चांगल्या गुणानं नीट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. नीटमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे त्याला चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.

माझ्या आई वडिलांना लिहिता आणि वाचता येत नाही पण त्यांना मी चांगलं आणि व्यवस्थित शिक्षण घ्यावं, असं वाटत होतं. आई वडिलांनी शेतात काम केल्यानं आम्ही स्थिरावू शकलो, राजू दुर्गम म्हणाला. राजू दुर्गम याच्या वडिलांकडे दोन एकर शेती आहे. त्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आणि इतर कामातून त्यांना शिक्षणासाठी २० हजार रुपये खर्च करणं शक्य नव्हतं.

राजूनं तिसरीपर्यंत गावात शिक्षण घेतल्यानंतर त्याला दुसऱ्या गावाला शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. दहावीचं शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील नातेवाईकाच्या सल्ल्यानुसार पुण्यात शिक्षणासाठी दाखल झालो, असं राजू सांगतो. राजू दुर्गमनं आई वडिलांनी सुरुवातीच्या काळात लागणारा शिक्षणाचा खर्च आनंदानं केल्याचं सांगितलं.
क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार कोणीच केला नाही; DRSचा निर्णय बदलण्यासाठी पाहा काय केलं

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओनं राजू दुर्गमच्या शिक्षणासाठी मदत केली. त्या एनजीओनं राजूच्या पुण्यातील शिक्षणाच्या खर्चासाठी मदत केली. मेळघाट, गडचिरोली आणि चंद्रपूरमधील जे आदिवासी विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी प्रयत्न करतात त्यांना एनजीओ मदत करते. एनजीओकडून मोफत निवासी मार्गदर्शन केलं जातं. पुण्यातील डॉक्टर आणि एमबीबीएसचे विद्यार्थी स्वयंप्रेरणेनं वैद्यकीय शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. अतुल ढाकणे यांनी शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा उत्तीर्ण व्हावं, असं त्यांचं ध्येय असल्याचं सांगितलं.

भारताने नाकारलं तरी अश्विनचं महत्व आयसीसीने दाखवून दिलं, पाहा नेमकं आता घडलं तरी काय…
राजू दुर्गमनं नीट परीक्षेत ५४२ वी रँक मिळवली आहे. त्यानुसार त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. शिक्षण घेतल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात परत येऊन इथल्या समाजाची सेवा करायची असल्याचं राजू म्हणाला.

ईशान किशन हे काय करून बसला; कसोटी पदार्पणाचे स्वप्न पाहत असताना, स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली

माणचा ओंकार गुंडगे UPSC मध्ये देशात ३८० वा; ४ वेळा संधी हुकली तरी मेहनतीने बाजी मारली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here