नवी दिल्लीः कारगिल लढाई जिंकण्यात बोफोर्स तोफने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता या बोफोर्स तोफपेक्षाही अधिक शक्तिशाली तोफेची निर्मिती भारतात होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने बोफोर्स 155 एमएम होवित्झर्स तोफ (Boforce 155 MM Howitzer) artillery gun बनवण्याचे काम उद्योगपती यांची कंपनी भारत फोर्जला (Bharat Forge) देण्यात आले आहे. भारत फोर्ज या तोफेला भारत 52 ( Bharat 52) असं नाव दिलं आहे. चार तोफांपैकी तीन तोफांची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात आहे. तर चौथ्या तोफेची चाचणी अंतिम टप्प्यात असून लवकरच ती भारतीय लष्कराचा भाग असेल. कल्याणी समूहाने तयार केलेली पहिली तोफ आहे, असं भारत फोर्ज कंपनीकडून सांगण्यात आलं.

भारत फोर्ज कंपनीने तयार केली

भारत फोर्जचे उपव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी यासंदर्भता माहिती दिली. पहिल्या तोफासाठी आम्ही तीन चाचण्या आणि दुसऱ्या तोफाच्या तीन चाचण्या केल्या आहेत. चाचणीचा अंतिम टप्पा संपला की आम्ही तोफेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू करणार आहोत. भारत फोर्ज हे संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या सुधारित उपक्रमाचा एक भाग आहे. काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १०१ शस्त्रे आणि सैनिकी प्लॅटफॉर्मच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. या १०१ उत्पादनांमध्ये (artillery gun) तोफांचा समावेश आहे, असं अमित कल्याणी म्हणाले.

तोफ (155 मिमी x 52 कॅलिबर)

आर्टिलरी गन जिला आम्ही असं नाव दिलं आहे. तिचे वजन १५ टन आहे आणि तोफेचे मारक क्षमता ही ४८ किमीपेक्षा अधिक आहे. ही तोफ ३० सेकंदात सहा तोफगोळे डागू शकते. ATAGS ही जगातील सर्वात प्रगत फील्ड तोफखाना प्रणाली मानली जाते. पण भारत अद्याप या प्रणालीचा समावेश सैन्यात करू शकलेला नाही. २०१६ मध्ये भारताने अमेरिकेकडून १४५ हॉवित्झर तोफा घेतल्या होत्या. ७५० दशलक्ष डॉलर्समध्ये ही डील झाली होती. अमेरिकेकडून घेतलेली १५५ मिमी x ३९ कॅलिबर अल्ट्रा लाईट हॉवित्झरची मारक क्षमता ही २४ ते ३९ किमी आहे. तर भारत ५२ एएजीएसपेक्षा खूपच कमी आहे.

‘आम्ही बनवत असलेलं उत्पादनं हे १०० टक्के स्वदेशी आहेत. ते १०० टक्के इथेच डिझाइन केलेले आहेत. तीन तोफा या चाचणीच्या प्रगत टप्प्यात आहेत. एक तोफ चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. ती सर्व प्रकारच्या परीक्षणातून गेली आहे. आता घेण्यात येत असलेले परीक्षण हे शेवटचे आहे, भारत फोर्जचे अमित कल्याणी यांनी सांगितलं.

भारतीय लष्कराला सुमारे १५० एटीएजीएस खरेदी करण्याच्या विचारात आहे. प्रत्येक एटीजीएसची किंमत ही १५ कोटी रुपये असू शकते. ‘आम्ही ज्या उत्पादनांवर लक्ष केंद्रीत केले आहे ती सर्व देशांतर्गत उत्पादनं आहेत. आर्टिलरी गनसारख्या काही उत्पादनांमध्ये तंत्रज्ञानाचा विचार केल्याच आमच्या प्रतिस्पर्धेत कोणीच नाही. यामुळेच आम्ही अंतिम चाचणीच्या समाप्तीच्या प्रतीक्षेत आहोत, असं अमित कल्याणी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

Leave a Reply to กรองหน้ากากอนามัย Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here