नवी दिल्ली: गुजरातच्या दिशेने सरकणारे सुपर चक्रीवादळ ‘बिपरजॉय’चा वेग आता मंदावला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (IMD), त्याचे स्थान सध्या देवभूमी द्वारकापासून १९० किमी वायव्येकडे (WNW) आहे. सुपर सायक्लॉन बिपरजॉय आज रात्री जखाऊ बंदराजवळून जाण्याची शक्यता आहे. तुफानी वेगाने वाहणारे वारे येणार्‍या भीषण संकटाचे संकेत देत आहेत. समुद्रात अनेक मीटर उंच लाटा उसळत असल्याने पाहणाऱ्यांची मनेही अस्थिर होत आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये येईपर्यंत त्याची गती बरीच मंदावली असावी असे सर्वांना वाटत आहे. तथापि, आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, हे चक्रीवादळ अजूनही लक्षणीय नुकसान करण्यास सक्षम आहे. चक्रीवादळाचा प्रभाव राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीसह नऊ राज्यांमध्ये दिसणार आहे. पाहू या या चक्रीवादळाबाबतची ताजी माहिती.बिपरजॉय चक्रीवादळ नेमके कुठे आहे?

Biparjoy Cyclone

बिपरजॉय चक्रीवादळ


IMD ने आज गुरुवारी दुपारी २.२५ वाजता चक्रीवादळ बिपरजॉयचे स्थान शेअर केले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अत्यंत तीव्र असलेले हे चक्रीवादळ मध्यरात्रीनंतर १.३० वाजता जाखौ बंदराच्या (गुजरात) १२० किमी WSW आणि देवभूमी द्वारकाच्या १७० किमी WNW वर उपस्थित होते. ते आज रात्रीपर्यंत जखाऊ बंदराजवळून (गुजरात) जाण्याची शक्यता आहे. आयएमडीने सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ कधी आणि कोठे धडकणार?

एमडीच्या म्हणण्यानुसार, बिपरजॉय चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया आज संध्याकाळी गुजरातमधील जखाऊ बंदराजवळ सुरू होईल. लँडफॉल प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

जखाऊ बंदर: येथे लँडफॉल होईल, नकाशात पाहा स्थान

Biparjoy Cyclone

बिपरजॉय चक्रीवादळ

बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कुठे दिसेल?

Biparjoy Cyclone

बिपरजॉय चक्रीवादळ

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारी भागाला सर्वाधिक फटका बसेल. या भागात वाऱ्याचा वेग ताशी १५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण गुजरातमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव शेजारील राजस्थान आणि मध्य प्रदेशपर्यंत राहील. दिल्ली-एनसीआरपासून पंजाब-हरियाणा, केरळ आणि बिहारपर्यंत वादळामुळे हवामान बदलेल. किनार्‍यालगतच्या भागात याचा अधिक परिणाम होईल.

चक्रीवादळ बिपरजॉय: हे वादळ किती विध्वंस आणेल

एनडीआरएफचे आयजी एनएस बुंदेला यांच्या मते, ‘कमकुवत इमारती, खांब, झाडे इत्यादींना चक्रीवादळाचा फटका बसेल. आम्ही सध्या नुकसानीचा अंदाज लावू शकत नाही. एअरलिफ्टसाठी आम्ही १५ टीम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या आहेत.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here