मुंबई: भारतात करोनाचा शिरकाव झाल्यापासून गेले पाच महिने प्रत्येक मोबाइलवर ऐकू येणाऱ्या करोनाच्या कॉलर ट्यूनला लोक अक्षरश: वैतागले आहेत. राजकीय नेतेही याला अपवाद नाहीत. प्रकाश आंबेडकरांनंतर आता मनसेचे नेते यांनीही या कॉलर ट्यूनला आक्षेप घेतला असून ती ताबडतोब बंद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

करोनाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाइलवर कॉलर ट्यून सुरू केली आहे. कुठल्याही व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीला कॉल करताच करोनाच्या संदर्भात माहिती दिली जाते. सुरुवातीच्या काळात लोकांना याचा फायदा झाला. मात्र, आता हीच कॉलर ट्यून परस्पर संवादामध्ये अडथळा ठरत आहे. अनलॉकचे अनेक टप्पे गेले. रेल्वे व शाळा वगळता बहुतांश व्यवहार पुन्हा मार्गावर आले आहेत. मात्र, मोबाइलवरची ती कॉलर ट्यून अद्यापही सुरूच आहे. आता लोकांनी ती माहिती ऐकणंही बंद केलं आहे. फोन लावताच आधी करोनाची माहिती ऐकायला मिळणार हे माहीत असल्यानं अनेक जण काही वेळ मोबाइल कानाला लावतच नाहीत. त्यामुळं आता ही कॉलर ट्यून सुरू ठेवण्याला काही अर्थही उरलेला नाही. त्यामुळंच ती बंद करावी, अशी मागणी होत आहे.

वाचा:

बाळा नांदगावकरांनी हीच मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘करोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाकडून गेले अनेक महिने कॉलर ट्यूनच्या माध्यमातून करोनाची माहिती दिली जातेय. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. तरीही कॉलर ट्यून सुरू आहे. या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाहीत,’ असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘करोनाच्या बाबतीत जी काही जनजागृती व्हायची आहे, ती विविध माध्यमांतून जाहिरातींद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरीत बंद करावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही काही दिवसांपूर्वी अशीच मागणी केली होती. एवढंच नव्हे, इतक्या दिवसांनंतरही ही कॉलर ट्यून सुरू ठेवण्यामागे नेमका काय उद्देश आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here