वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

करोना संसर्गामुळे चालू शैक्षणिक वर्षातील तीन महिने आतापर्यंत वाया गेले असून, यावर पर्याय म्हणून बहुतांश शाळांनी स्वीकारला आहे. विद्यार्थी व पालकांकडूनही या पर्यायास प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. परंतु, देशभरातील अनेक विद्यार्थी तांत्रिक सुविधांअभावी या राहात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. द नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने () केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, वा यांसारखी साधने नसल्याने किमान २७ टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणात सहभागी होऊ शकत नसल्याचे समोर आले आहे.

  • सर्वेक्षणात ३४ हजार जणांचा सहभाग
  • २८ टक्के विद्यार्थ्यांना अपुऱ्या वीजपुरवठ्याची समस्या
  • टीव्ही, रेडिओ या माध्यमांचा नगण्य वापर

‘एनसीईआरटी’ने केलेल्या या सर्वेक्षणात ३४ हजार जण सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक मुख्याध्यापकांनी अभिप्राय नोंदवले. या सर्वेक्षणात केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयांसह सीबीएसई शाळांच्या शिक्षक, मुख्याध्यापकांचाही सहभाग होता. यातील २७ टक्के सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे स्मार्टफोन वा लॅपटॉप नसल्याचे सांगितले. तर, २८ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अपुऱ्या वीजपुरवठ्याची समस्या जाणवत असल्याचेही स्पष्ट झाले. या इलेक्ट्रॉनिक साधनांचा शैक्षणिक उद्देशासाठी प्रभावीपणे वापर करण्याचे ज्ञान नसणे तसेच, या ऑनलाइन माध्यमांमध्ये शिक्षक पारंगत नसणे या अडचणीही येत असल्याचे या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले.

ऑनलाइन शिक्षण ही सध्याची गरज झाली असली, तरी ३६ टक्के विद्यार्थी हे आजही त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाठ्यपुस्तके व अन्य पुस्तकांवर अवलंबून असल्याचे यात दिसून आले. यानंतर स्मार्टफोन व लॅपटॉपना पसंती मिळाली आहे. अध्ययन व अध्यापनासाठी टीव्ही, रेडिओ या माध्यमांचा नगण्य वापर होत असल्याचेही यात स्पष्ट झाले.

करोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील शाळा आणि विद्यापीठे १६ मार्चपासून बंद ठेवली आहेत.

वाचा :

वाचा :

गणित, विज्ञानाची समस्या

गणितातील अनेक संज्ञा या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजावून सांगाव्या लागतात. हे शिकवल्यानंतर शिक्षकांना त्याचा मागोवा घ्यावा लागतो. विद्यार्थ्यांना ते कितपत समजले आहे हे पहावे लागते. या सर्व गोष्टी ऑनलाइन माध्यमातून आवश्यक त्या प्रमाणात साध्य होत नसल्याचे दिसून आले. विज्ञानाच्या विषयांमध्येही हीच समस्या भेडसावत आहे.

निम्म्या विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके नाहीत

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठ्यपुस्तके नसल्याचे सांगितले. एनसीईआरटीच्या वेबसाइटवर तसेच दीक्षावर ई-पाठ्यपुस्तके उपलब्ध असली, तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकातून शिकण्याची सवय असल्याने तसेच ई-पाठ्यपुस्तकांच्या उपलब्धतेबाबत जागरुकता नसल्याने अडचणी येत आहेत, असे सर्वेक्षणात समोर आले.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here