मुंबई : गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. निफ्टीने गुरुवारी ९६.२० अंकांची घसरण घेत ११,४०० च्या पातळीखाली ११,३१२.२० अंकांवर विश्रांती घेतली. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सनेदेखील ३९४.४० अंकांची घसरण घेत ३८,२२०.३९ अंकांवर बंद झाला.

देशांतर्गत इक्विटी मार्केटमधील विक्री आणि जागतिक नकारात्मक संकेतांमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात गुरुवारी अवमूल्यन झाल. तो ७४.९८ रुपयांवर स्थिरावला.अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव आणि अर्थव्यवस्थेवरील कोरोनाच्या परिणामामुळे वाढलेली चिंता, यामुळे आशियाई आणि युरोपियन बाजारात घसरण झाली. नॅसडॅक ०.५७ टक्के, एफटीएसई १०० ने १ टक्के, एफटीएसई एमआयबीमध्ये ०.९१ टक्के, निक्केई २२५ ने १ टक्क्यांची घसरण झाली. हँगसेंगमध्येही १.५४ टक्क्याची घट दिसून आली.

विकासदराबाबत वर्ल्ड बँकेचा ताजा अहवाल गुंतवणूकदारांची धडकी भरवणारा आहे. लवकरच फेडरल रिझर्व्हकडून देखील मागील बैठकीचे इतिवृत्त जारी केले जाणार आहे. करोनाचा परिणाम पाहता बँक अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबत काय भाकीत करते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की कालच्या सत्रात बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे ०.८७ टक्के आणि ०.७२ टक्क्याची वृद्धी घेतली.निफ्टी बँक निर्देशांकात काल मोठी घसरण झाली. मागील दोन सत्रात बँका आणि वित्त संस्थाच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. त्याचा फायदा उठवत आज गुंतवणूकदारांनी नफावसुली केली.

जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लि.: वित्तीय वर्ष २०२१ मधील पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा २०.८ कोटी रुपये झाला. तर कंपनीचा महसूल ५७.३ टक्क्यांनी घसरला. तरीही कंपनीचे शेअर्स १.७६ टक्क्यांनी वाढले आणि ११२.७० रुपयांवर बंद झाला.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड: कंपनीच्या शेअर्समध्ये २.०३ टक्क्याची वृद्धी झाली आणि त्यांनी ४९०.५० रुपयांवर बंद झाला. २०२१ च्या उत्तरार्धात कंपनीने औषध शोध सहाय्यक कंपनी इचनोस सायन्सेसमधील स्टेक विकल्यानंतर हे परिणाम दिसून आले.

टाटा पॉवर कंपनी लिमिटेड: कंपनीने नुकतेच सध्याच्या व्यवसायाची रचना तसेच देशातील पहिल्या २ कंपन्यांपैकी एक बनण्यासाठीच्या योजनेचे प्रदर्शन केले. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ८.०२ टक्क्याची वाढ झाली आणि शेअर ६१.२५ रुपयांवर बंद झाला.

मुथुट फायनान्स लिमिटेड: २०२१ या वित्त वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीने आपले निकाल जाहीर केले. त्यानंतर कंपनीचा शेअर ५.४७ टक्क्यांनी घसरला व १,१८७ रुपयांवर बंद झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here