म.टा. प्रतिनिधी, नगर: गांजा ओढण्यासाठी एकत्र आलेल्या आदिवासी तरुणांमध्ये तुफान हाणामारीत तीन सख्या भावांसह चौघांचा झाला. तालुक्यातील विसापूर फाटा येथे ही घटना घडली. घटनेनंतर तिघांचे मृतदेह नातेवाइक तरुणानेच दुचाकीवरून घरी नेले.

अहमदनगर-दौंड रस्त्यावर विसापूर फाटा आहे. त्या भागात आदिवासी-पारधी समाजाची वस्ती आहे. तेथे गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि पुढील कारवाई सुरू केली. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, सुरेगाव येथील आदिवासी समाजातील हे तरूण गांजा ओढण्यासाठी विसापूरफाटा येथे जमले होते. त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. काळे व चव्हाण कुटुंबातील या तरुणांमध्ये हाणामारी सुरू झाली. यामध्ये लिंब्या हरब्या काळे (वय२२) नातीक कुंजा चव्हाण (वय ४०), नागेश कुंजा चव्हाण (वय १४) व श्रीधर कुंजा चव्हाण (वय ३५) यांचा मृत्यू झाला. यातील तिघे चव्हाण सख्खे भाऊ आहेत. चाकू आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला.

या भागातील गटांत नेहमीच वाद होत असतात. त्यामुळे घटना पाहणाऱ्या ग्रामस्थांना सुरुवातीला हा नेहमीचाच प्रकार असावा, असे वाटले. या भागात स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून सापळा रचून फसविलेल्या व्यापाऱ्यांना लुटण्याचे प्रकार होत असतात. त्यानंतर लुटीच्या मालावरून टोळीत अपापसांत वाद होण्याच्या घटना नेहमीच्या असल्याने सुरुवातीला ग्रामस्थांनी त्याकडे कानाडोळा केला. काही वेळात तेथे आणखी काही लोक आले. त्यातील एकाने तेथील तिघांचे मृतदेह दुचाकीवरून नेले. हा तरुण खून झालेल्या तिघांचा मावस भाऊ असल्याचे नंतर सांगण्यात आले. घटनास्थळी एक मृतदेह पडून होता. तर हल्लेखोर पळून गेले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर काहींनी पोलिसांना याची माहिती दिली. बेलवंडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह नगरहून वरिष्ठ पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सुरेगाव आणि परिसरात हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला. घटनेबद्दल आदिवासी वस्तीवर आणि ग्रामस्थांकडेही पोलीस चौकशी करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here