अमरावती येथील संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक नितीन कदम आणि प्रवेश कदम हे पुढाकार घेऊन गोरगरीबांचे लग्न लावून दिले. आज अमरावती येथील जाधव पॅलेसमध्ये हा सर्वधर्मीय आंतरजातीय विवाह सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी साडी चोळी, अलंकार व नवरदेवाकडील पाहुण्यांना गोड जेवणाचा बेत आखत ४५ मुलींचे कन्यादान करण्यात आले.
विशेष म्हणजे एकाच मांडवात हिंदू बौद्ध पद्धतीने विवाह पार पडला. याच मंडपात दिवाळीमध्ये मुस्लिम समाजाचा विवाह पार पडण्याची घोषणा सुद्धा झाली. एकीकडे एक आणि दोन मुलीच्या लग्नाचा विवाह खर्च झेपत नसताना नितीन कदम यांनी चक्क 45 मुलींची जबाबदारी घेत त्यांचे लग्न थाटामाटात लावून दिले. त्यामुळे हा विवाह सोहळा जिल्ह्याभरात चांगला चर्चेत आला आहे.