मुंबई: राज्यातील राजकीय नेते व लोकप्रतिनिधींना करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले असून आता दक्षिणचे काँग्रेसचे आमदार यांना करोनानं गाठलं आहे.

ऋतुराज यांनी स्वत: या संदर्भातील ट्वीट केलं आहे. ‘माझी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करू नये,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

वाचा:

कोल्हापुरातील सर्वात तरुण आमदार असलेले ऋतुराज पाटील हे तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. जिल्ह्यात ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. कोल्हापूरमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यानं काही दिवसांपूर्वीच त्यांनी करोनाबाबत जनजागृती करण्यासाठी एक व्हिडिओ ट्वीट केला होता. खास कोल्हापुरी शैलीतील तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. ‘हे कोल्हापूर आहे. एकदा ठरलं की ठरलं. करोनाला तटवायचं,’ असं आवाहन त्यांनी कोल्हापूरकरांना केलं होतं.

करोनाची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी विविध कामांनिमित्तानं मतदारसंघामध्ये फिरत आहेत. बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत आहे. त्यातून लोकप्रतिनिधींना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. ऋतुराज पाटील हे देखील करोनाच्या काळात सातत्यानं कोविड योद्धे म्हणून काम पाहत होते. जनजागृती करण्याबरोबरच पक्ष व सरकारी पातळीवर अनेक बैठकांना त्यांची उपस्थिती होती. या कामाच्या दरम्यान आलेल्या संपर्कातून त्यांना लागण झाली असावी, अशी शक्यता आहे.

वाचा:

ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख व साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही करोनाची बाधा झाली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here