बीड: खरंतर मित्र कंपनी म्हटलं की अतरंगीपणा हा पाहायला मिळतो आणि यामध्ये कधी पार्टीचं आयोजन केलं असेल तर आवर्जून मित्र कंपनी न सांगता वेळेवर हजर होते. मात्र ,हेच मित्र सकाळी व्यायामासाठी जर एकत्र यायचं असेल तर कोणी ना कोणी कोणते ना कोणते कारण देऊन दांडी मारताना दिसून येतात. बीडमध्ये अशाच एका आळशी मित्राला सकाळी लवकर उठण्यासाठी लक्षात राहावं यासाठी मित्रांनी व्यायामाला दांडी मारलेल्या मित्राची गंमत केली आहे. सगळ्या मित्रांनी मिळून त्या मित्राच्या दारात चक्क ब्रास बँड वाजून त्याला व्यायामाची आठवण करून दिली आहे.

मित्र कंपनी म्हटलं की आतरंगीपणा येतो त्यात हुल्लडबाजी येते मात्र आयुष्य चांगलं जगण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आता महाराष्ट्रभर अनेक मित्रांचे असे ग्रुप होत चालले आहेत की रोज सकाळी उठून आपल्या शरीर दृष्टी चांगली ठेवण्यासाठी व्यायाम करत आहेत. एकमेकांच्या नादानं का होईना हे मित्र चांगल्या गोष्टी आत्मसात करतात. मात्र, यामध्ये देखील काही अतरंगीपणा मित्र कंपनी करतात.
राज्यातील सरकारी शिक्षकांच्या बदल्या बंद होणार, येत्या दोन दिवसांत निघणार आदेश
अनेक ग्रुपमध्ये एखादा मित्र तरी आळशी निघतो आणि त्याचाच प्रत्यय आज बीडमध्ये आला आहे. बीडमध्ये काही मित्र एकत्र मिळून सकाळी व्यायामाला जायचे त्यांच्यातील एक मित्र नेहमीच दांडी मारत असे मग त्याला नेहमीच आपण उठवायला का जावं, त्यालाही कळणे गरजेचे आहे. यासाठी सगळ्या मित्रांनी त्याने व्यायामासाठी दांडी मारल्यानंतर चक्क पहाटेच्या वेळी ब्रास बँड घेऊनच त्याच्या दारात जाण्याचा निर्णय घेतला.

बीडमध्ये अंदाधुंद गोळीबार: दोन जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक, शहरात खळबळ

मित्राला त्यांनी टी-शर्ट नाईट पॅन्ट घालून दारात बसवलं आणि त्याच्यासमोर वाजवले ते गाणं “बहारो फुल बरसाओ मेरा मेहबूब आनेवाला है “आणि या गाण्याने चक्क संपूर्ण कॉलनीच जागी झाली नेमकं काय प्रकार आहे हा समजल्यानंतर प्रत्येकाला हसू आवरत नव्हतं. मात्र आता यानंतर तरी हा मित्र सकाळी व्यायामासाठी न चुकता जाणार हे मात्र नक्की…बीडमधील हा व्हिडिओ पाहता पाहता व्हायरल झाला आहे.
Devendra Fadnavis: मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? पत्रकारांचा थेट प्रश्न, देवेंद्र फडणवीस हसले आणि म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here