ठाणे: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला मिरारोड हत्याप्रकरणाच्या तपास आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी मनोज साने याच्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती लागली आहे. मनोज साने याच्यावर त्याची पत्नी सरस्वती वैद्य हिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे निर्घृणपणे तुकडे केल्याचा आरोप आहे. मात्र, मनोज याने सरस्वती हिने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचा दावा केला होता. या सगळ्याचा आळ माझ्यावर येईल म्हणून मी घाबरुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले, तिच्या हत्येशी माझा काहीही संबंध नाही, असे मनोज याने पोलिसांनी सांगितले होते. मात्र, काही दिवसांच्या चौकशीनंतर आता मनोज सानेने आपणच सरस्वतीला कीटकनाशक पाजून ठार मारले, अशी कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज साने याने बोरिवली येथील एका दुकानातून कीटकनाशक विकत घेतले होते. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मनोजला या दुकानात नेले होते. दुकानदाराने मनोज आपल्या दुकानातून कीटकनाशक घेऊन गेल्याचे सांगितले. या दुकानातून विकण्यात आलेल्या कीटकनाशकाचे नाव आणि बॅच क्रमांक हा मनोज सानेच्या फ्लॅटमध्ये सापडलेल्या केमिकलशी जुळणार आहे. त्यामुळे मनोजने याच दुकानातून कीटकनाशक विकत घेतल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती आहे.

Mira Road Murder: मनोज साने थिअरीवर अडून बसला, तज्ज्ञ म्हणतात आता पोलिसांसमोर दोनच पर्याय उरलेत

मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे दोघेजण २०१४ पासून एकत्र राहतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते. काही डेटिंग अॅप्सवर मनोज साने याची अकाऊंटस होती. ही गोष्ट सरस्वती सानेच्या लक्षात आल्यामुळे ती त्याच्यावर संतापली होती. त्यामुळे मनोज आणि सरस्वती यांच्यात सतत भांडणे व्हायची. ३ जून रोजी दोघांमध्ये अशाच कारणावरून भांडण झाले. त्यावेळी सरस्वती मनोजला म्हणाली की, ‘तू आता माझ्याशी पूर्वीसारखा वागत नाहीस’. त्यानंतर सरस्वतीने मनोजला बेडरुममधून बाहेर काढले. त्यामुळे संतापलेल्या मनोजने सरस्वती वैद्य हिला ठार मारले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

Mira Road: सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यापूर्वी मनोज सानेने ‘त्या’ रात्री मोबाईलवर काय सर्च केलं?

मनोज सानेनं ताकातून सरस्वतीला कीटकनाशक पाजलं

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोजने ४ जूनला सरस्वती हिची हत्या केली. मनोजने १५ दिवसांपूर्वी दुकानातून कीटकनाशकाची बाटली विकत आणली होती. हे कीटकनाशक ताकात मिसळून त्याने सरस्वतीला दिले. यानंतर मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले. या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मनोजने हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि भाजले होते. मांस आणि हाडं वेगळी करण्यासाठी आपण मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवल्याचे मनोजने पोलिसांनी सांगितले होते. ७ जून रोजी सानेच्या शेजाऱ्यांना त्याच्या घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली होती. मनोजने मृतदेहाची दुर्गंधी लपवण्यासाठी घरात रुम फ्रेशनर मारले होते. याशिवाय, मृतदेहाला निलगिरीचं तेल लावलं होतं. पोलिसांना मनोजनच्या फ्लॅटमध्ये निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या सापडल्या.

पोलिसांच्या हाती पिशव्या, कुत्र्यांचा भेसूर आवाज.. मीरारोडमध्ये थरकाप उडवणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here