चंद्रपूर : चंद्रपूरच्या नगरपरिषद कार्यालयात मृत कोंबड्या अन् अवयव आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला लोकांच्या नेमका काय प्रकार आहे हे लक्षात आलं नाही. पण नंतर तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. चिकन, मटणच्या दुकानदार स्वच्छता राखत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी, घाण पसरली होती. याचा त्रास सामान्य नागरिकांना होत होता. वारंवार नगरपालिकेकडे याबाबत तक्रार केल्या गेली. मात्र, तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही. याला त्रासलेल्या एका नागरिकाने मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या कक्षात मृत कोंबड्या, त्यांची अवयवे व कचरा टाकला. या प्रकारामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली असून गडचांदुर येथील वॉर्ड क्र. दोनमध्ये चिकन, मटण विक्रीची दुकाने आहेत. या दुकानामुळे आसपास असलेल्या नागरिकांना दुर्गंधी व फेकलेल्या जैविक कचऱ्याचा त्रास सहन करावा लागतो. दुकानदाराने फेकलेली घाण तत्काळ साफ करावी, अशी न. प. पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना तोंडी तक्रार केल्या गेली होती.

Maharashtra Rain Alert: राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
याबाबत नगरपरिषदेने गावातील वेगवेगळ्या परिसरात असलेली चिकन, मटणाची दुकाने एकाच ठिकाणी हलविण्यात येतील, असा ठरावही मंजूर केला होता. मात्र, या ठरवाची अमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सुरूच होता. या त्रासाला कंटाळलेल्या रफीक निजामी या नागरिकांने थेट नगरपरिषद गाठले आणि मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या कक्षात मृत कोंबड्या, त्यांची अवयवे व कचरा टाकला. यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान या प्रकाराची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलगी गर्भवती पण बॉयफ्रेंडचं नाव सांगण्यास नकार, सगळी हिस्ट्री डिलीट; अखेर पोलिसांनी शक्कल लढवली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here