Pune Rain Alert : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पुणेकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला आहे. जून महिन्यात केवळ २०.४ मिलीमीटर पाऊस झाल्यानं पुणेकर त्रस्त झाले आहेत.
महाराष्ट्रात दर वर्षी सात जूनच्या दरम्यान पाऊस दाखल होतो आणि पुढील आठवडाभरात संपूर्ण राज्य व्यापतो. या वर्षी प्रतिकूल वातावरणामुळे मान्सून अद्याप कोकणात रेंगाळला आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात मान्सूनच्या राज्यातील प्रवासास अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत.
पुढील दोन दिवस हलक्या सरींची शक्यता
पुण्यात शुक्रवारी दिवसभर वारे वाहत असल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. दुपारनंतर आकाश ढगाळ होते, त्यामुळे उन्हाचे चटके बसले नाहीत. संध्याकाळी शहराच्या बहुतांश भागात हलक्या सरींनी हजेरी लावली. दिवसभरात कमाल ३३.८ आणि २५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील उच्चांकी तापमान ४२.६ अंश सेल्सिअस चंद्रपूरमध्ये आणि नीचांकी तापमान १८.४ अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये नोंदविण्यात आले. पुण्यात पुढील दोन दिवस वातावरण संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, हलक्या सरी पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.