म.टा. प्रतिनिधी, : प्राध्यापक धीरज राणे हे त्यांच्या पत्नी डॉ. सुषमा राणे यांच्यावर संशय घ्यायचे. यातूनच दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. धीरज यांच्या संशयी वृत्तीला कंटाळून सुषमा यांनी टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या दिशेनेही तपास करायला सुरुवात केली आहे. मात्र अद्यापपर्यंत राणे कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यात कोराडी पोलिसांना यश आलेले नाही.

धीरज हे संशयी वृत्तीचे होते. डॉ. सुषमा यांच्यावर ते संशय घ्यायचे. त्यांनी सुषमा यांचा मोबाइल स्वत:च्या मोबाइलवर डायव्हर्ट करुन ठेवला होता. संशयातून दोघांमध्ये सतत वाद होत होते. मात्र दोघेही मुलांसमोर वाद घालत नव्हते. घराबाहेर अथवा कारमध्ये बसून ते वाद घालायचे, असेही कळते. सुषमा यांनी पती धीरज, मुलगा ध्रुव व मुलगी वण्या यांना जेवनातून गुंगीचे औषध दिले. तिघेही बेशुद्ध झाल्यानंतर डॉ. सुषमा यांनी इंजेक्शन देऊन त्यांना ठार मारले. त्यानंतर सुषमा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान धीरज यांना कोणतरी ब्लॅकमेल करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी या दिशेनही तपासाची चक्रे फिरवली. गुरुवारी या प्रकरणात कुटुंबातील कलहाची झालर समोर आली. रोज नवीन कारणे समोर येत असल्याने या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. चारही पथकाच्या चौकशी अहवालानंतरच या घटनेचे नेमके कारण समोर येईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here