मॉस्को: रशियाने करोनाच्या संसर्गाला अटकाव करणारी लस विकसित केली असल्याची घोषणा केली होती. आता रशियाने पुढील आठवड्यात या लशीची चाचणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. तब्बल ४० हजारजणांना ही लस देण्यात येणार आहे. एका परदेशी संशोधन संस्थेच्या देखरेखीत ही चाचणी होणार आहे. रशियाने लस सापडली असल्याचा दावा केल्यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी त्यावर शंका उपस्थित केल्या होत्या.

रशियाने करोनावरील लशीचे नाव ‘स्पुटनिक व्ही’ असे ठेवले आहे. जगात सोव्हिएत रशियाने पहिल्यांदा ‘स्पुटनिक’ हा उपग्रह सोडला होता. त्याच्याच नावावरून या करोना लशीला नाव देण्यात आले आहे. रशियाचे थेट गुंतवणूक निधीचे मुख्य अधिकारी किरील दिमित्रीव यांनी सांगितले की, लशीबाबतचा डेटा या महिन्याच्या अखेरीस एका संशोधन नियतकालिकेत प्रकाशित होणार आहे. रशियाकडे एक अब्ज डोसची ऑर्डर नोंदवण्यात आली आहे. सध्या रशियाकडे ५० कोटी डोस निर्मिती करण्याची क्षमता आहे. लस विकसित करणाऱ्या मॉस्कोच्या गमलेया इन्स्टिट्यूटनुसार, जवळपास ४० हजार लोकांवर ४५ केंद्रावर चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीची डेटा जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा:

इतर देशांत चाचणी घेण्यास उत्सुक

किरील दिमित्रीव यांनी म्हटले की, संयुक्त अरब अमिरात, भारत, ब्राझील, सौदी अरेबिया आणि फिलीपाइन्ससह अनेक देशांमध्ये अंतिम टप्प्यातील चाचणी घेण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रशियाने विकसित केलेल्या लशीला देशांतर्गत रेग्युलेटरी मान्यता मिळाली असून राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी परवाना देण्यात येणार असल्याचीही घोषणा केली आहे. अंतिम टप्प्यातील चाचणीपूर्वी लशीला मान्यता देण्यावरून अनेक शंका, प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत .

वाचा: वाचा:
यासाठी लशीला मंजुरी

दिमित्रीव यांनी सा्ंगितले की, लवकरात लवकर मंजुरी मिळाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना या लशीचा फायदा होणार आहे. या लशीचा वापर ऐच्छिक असणार आहे. त्याशिवाय लशीचा वापर करणाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणीदेखील होणार आहे. रशियन चाचणीचे परिक्षण परदेशातील संस्थेद्वारे होणार आहे. जेणेकरून या चाचणीचा डेटा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार जमा केला जाऊ शकतो. मात्र, कोणती संस्था याचे परिक्षण करणार आहे, याबाबत त्यांनी काहीही माहिती दिली नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here