म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या, तर महाराष्ट्रामध्ये भाजपला सव्वाशे जागा मिळतील,’ असा अंदाज इंटरनेटवर पाहणी करून अचूक अंदाज वर्तविण्याबाबत ख्याती असलेल्या ‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पंचवीस जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ३५ टक्के जनतेचा कौल आहे, असेही या पाहणीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जबाबदारी नसलेलं शोभेचं पद नको, माझी घुसमट मीच थांबवतो; उद्धव ठाकरेंना पत्र धाडत शिशिर शिंदेंचा जय महाराष्ट्र

ठाकरे गटाला १७ ते १९ जागा

‘ट्विटर’द्वारे हे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये ‘न्यूज एरिना’ने केलेल्या पाहणीचे अंदाज बरोबर आले होते. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसने बहुमत मिळविले होते. महाराष्ट्राबद्दल केलेल्या पाहणीमध्ये भाजपला आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे १२३ ते १२९ जागा मिळतील असा अंदाज वर्तविला गेला आहे. शिवसेनेला सुमारे पंचवीस जागा मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेसला ५५, तर काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळणे अपेक्षित आहे. शिवसेना ठाकरे गटाला सतरा ते एकोणीस जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला असून, इतर पक्ष व अपक्षांना बारा जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Manisha Kayande : मनिषा कायंदे यांच्यावर ठाकरे गटाची मोठी कारवाई, शिंदे गटात जाण्यापूर्वीचं उचललं पाऊल

आघाडीत फायदा काँग्रेसचा

महाराष्ट्राच्या विधानसभेतील २८८ जागांचे अंदाज वर्तविण्यात आले असून विभागवार आकडेवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली, तर काँग्रेसला सर्वाधिक फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून आघाडी नसेल, तर काँग्रेसला २८ ते तीस जागाच मिळू शकतील, असेही वर्तविण्यात आले आहे. नुकत्याच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात सर्वाधिक पसंती असल्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या पाहणीमध्ये फडणवीस यांच्या खालोखाल अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे या क्रमाने मुख्यमंत्रिपदाची पसंती आहे.

खोके दिले तरी कोणी तुम्हाला कुटुंबात घेणार नाही, उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here