जळगाव : जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजता घडली. सलमान शकील बागवान (वय २४, रा.जोशीपेठ, बागवान वाडा) असे मयत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रशिक्षकांच्या दुर्लक्षामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जोशी पेठेतील बागवान वाड्यात सलमान हा आई, वडील शकील बागवान, मोठा भाऊ व तीन बहिणींसोबत राहत होता. सलमान गेल्या अनेक वर्षांपासून फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. रविवारी फळ विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने, सलमान सुट्टीच्या निमित्ताने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मित्रांसोबत जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जलतरण तलावात पोहायला आला होता.

पतीनिधनानंतर २० वर्ष लेकाला सांभाळलं, त्यानेच आईचा घात केला

रविवारची सुट्टी असल्याने जलतरण तलावात पोहणाऱ्यांची संख्या जास्त होती. मित्रांसोबत पोहत असतानाच, सलमान तलावातील जास्त खोली असलेल्या भागात पोहत होता, त्याठिकाणी खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. सलमान बुडत असल्याचे काही मित्रांच्या लक्षात आले. जलतरण तलावातील सुरक्षा रक्षकांना बोलावून, त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

भावासोबत पोहायला गेला, भाचा शेततळ्यात बुडताच मामाने उडी मारली; पण क्षणात होत्याचं नव्हतं…
प्रशिक्षकांच्या दुर्लक्षामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान, क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात जोशी पेठ व बागवान वाड्यातील सलमानच्या नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती . घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मासे पकडण्याच्या जाळ्यात पाय अडकला, NDA तील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; देशसेवेचं स्वप्न अधुरं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here