मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास मिरज-सांगोला महामार्गावर काळूबाळूवाडी पुलावर हा अपघात झाला. या अपघातात विशाल कटाप,बसवराज गौडरू,शांतेश्वर सूर्यकांत शिरोळे (वय ३७, रा. स्वामी विवेकानंदनगर,हत्तुरे वस्ती, सोलापूर) असे तिघेजण दुचाकीवर ट्रिपल सीट बसून सोलापूरकडे येत असताना त्यांचा अपघात झाला.
शांतेश्वर शिरोळे, बसवराज गौडरू व विशाल कटाप हे तिघे ट्रिपल सीट दुचाकीवर (एम एच १३ बी डब्ल्यू ७५३४) या वाहनाने बाळूमामांच्या दर्शनासाठी निघाले होते. तर सागर विठ्ठल पवार व दीपक सूर्यकांत शिरोळे असे दोघे जण (एम एच १३ बी.एस. ८३५६) या दुचाकीने शनिवारी रात्री १२ च्या सुमारास सोलापूर येथून आदमापूरला निघाले होते.अमावास्येनिमित्त श्रीक्षेत्र आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन घेतले. रविवारी देवदर्शन आटोपून दुपारी १२ च्या सुमारास पाचही जण मिळून परत त्याच दोन दुचाकींवरून सोलापूरकडे परतत होते.
यावेळी विशाल, बसवराज, शांतेश्वर हे तिघेजण एका दुचाकीवर बसले होते. ते ट्रिपलसीट मिरजमार्गे सांगोल्याच्या दिशेने निघाले होते. रविवारी सायं ५.१५ च्या सुमारास त्यांची दुचाकी जुनोनी जवळ काळूबाळूवाडी पुलाच्या दुभाजकाला वेगात आदळली. अपघाताचा जोरदार आवाज झाल्याने दुसऱ्या दुचाकीवरील दोघेजण माघारी वळून आले. त्यावेळी अपघातात विशाल कटाप हा दुचाकीवरून उडून खाली सर्व्हिस रोडवर पडला होता.रोडवर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागेवरच ठार झाला.शांतेश्वर शिरोळे हा रस्त्यावर पडून जखमी झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत याबाबत दीपक सूर्यकांत शिरोळे (रा. हत्तुरे वस्ती) यांनी फिर्याद दिली आहे.
where to buy cheap trazodone without rx