नवी दिल्ली: देशात तयार झालेल्या लशींची चाचणी (Corona Vaccine Trial) सध्या सुरू असून या वर्षीच्या शेवटपर्यंत भारतात लस उपलब्ध होऊ शकते. हा दावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री हर्षवर्धन () यांनी केला आहे. भारत बायोटेकने बनवलेली ही करोनावरील स्वदेशी लस या वर्षाच्या शेवटी उपलब्ध होईल असे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट सांगितले आहे. सन २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ही लस वापरासाठी तयार असेल असेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले. (Corona Vaccine could be available by the end of 2020)

भारतात तीन लशींवर सुरू आहे काम
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या माहितीनुसार, जगभरात लशींची चाचणी फास्ट-ट्रॅकमध्ये केली जात आहे. तसेच स्वदेशी लशींची चाचणी या वर्षाच्या शेटवटपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या लशी किती परिणामकारक आहेत हे तेव्हापर्यंत स्पष्ट होणार आहे. बाजारात पोहोचण्याचा कालावधी आणखी कमी करावा या दृष्टीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आधीपासूनच ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीच्या लशीचे उत्पादन करत आहे. उर्वरित दोन लशी तयार होऊन त्या बाजारात येईपर्यंत आणखी एखाद महिन्याचा काळ लागेल, असेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

तिन्ही लशींबाबत काय आहे लेटेस्ट अपडेट?

ऑक्सफर्ड लस: सीरम इन्स्टीट्यूटने भारतात आपल्या लशीची मानवी चाचणी सुरू केली आहे. अस्त्राजेनेकाची ही लस या वर्षाच्या शेवटपर्यंत उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

Covaxin: हैदराबादच्या भारत बायोटेकच्या या या लशीची चाचणी दोन आठवड्यांपूर्वी सुरू करण्यात आली. ही लस देखील या वर्षाच्या शेवटपर्यंत उपलब्ध होऊ शकेल.

क्लिक करा आणि वाचा-

जायकोव्ह-डी: झायडस कॅडिलाने देखील मानवावर लशीची क्लिनिकल चाचणी करणे सुरू केले आहे. काही महिन्यांमध्ये ही चाचणीही पूर्ण होईल.

क्विक करा आणि वाचा-

लस मिळवण्यासाठी काय आहे योजना?
भारताला लस उपलब्ध व्हावी या दृष्टीने आरोग्य मंत्रालय योजना आखत असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. भारत हा जगातील सर्वात मोठा लस निर्माण करणारा देश आहे. भारत जगातील लशीच्या गरजेच्या दोन तृतियांश इतका भाग निर्यात करतो. ICMR आणि भारत बायोटेकने एक करार केला असून भारतातील लस निर्मिती यशस्वी झाल्यास भारतात ती स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यास प्राथमिकता दिली जाणार आहे, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here