पुणे : पुण्यातील स्वारगेट परिसरात २०१२ साली एसटी चालक संतोष माने नावाच्या व्यक्तीने एसटी बसने नऊ जणांना चिरडले होते. त्यामुळे ती घटना अद्यापही पुणेकर विसरलेले नाहीत. मात्र, आज पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पीएमपीएमएल बस चालकामुळे शहरात पुन्हा तसाच अपघात घडणार होता.

मद्यधुंद चालकाने पुणे स्टेशन डेपोमधील पीएमपीएमएल बस काढून काळेपडळ परिसरात आणली. फराटे चौकाजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ येताच त्याने बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेने नेली. बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं लक्षात येताच बसमधील दोन तरुणांनी प्रसंगावधान राखत वाहनावर ताबा मिळवत बाजूला घेतली अन् मोठा अनर्थ होता होता टळला.

माझ्यासारख्या सिनियर नेत्याला ज्युनिअर व्यक्ती हुकूम द्यायची, मनिषा कायंदेंनी अखेर मनातील खदखद बोलून दाखवलीच
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे नितीन गावडे यांनी डेपो मॅनेजरशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की “ही बस कंत्राट पद्धतीच्या अखत्यारित येत असल्याने आम्हाला चालकविषयी काही माहिती नाही”.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन डेपोत उभी असलेली बस मद्यधुंद चालकाने बाहेर काढली आणि हडपसरमधील काळेपडळ परिसरात आणली. गाडीत १०-१२ प्रवासी बसले होते. फराटे चौकातील रेल्वे क्रॉसिंगजवळ येताच त्याने गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने घेतली. चालक मद्यधुंद असल्याचे लक्षात येताच गणेश काळसाईत, मयूर बोराडे या तरुणांनी प्रसंगावधान राखत स्टीयरिंग ताब्यात घेत गाडी थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला.

World Cup 2023: खड्ड्यात जा नाही येत तर…. भारताबद्दल बोलताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची जीभ घसरली

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here