लखनऊ : उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. झाड कापण्यास विरोध केल्यानं उच्च जातीमधील लोकांनी ३२ वर्षीय दलित तरुणाला मारहाण केली. चाकूनं त्याच्या गुप्तांगावर चाकूनं वार केले. या घटनेतील पीडित सत्येंद्र कुमार यानं त्याच्या गर्भवती पत्नीला देखील कुऱ्हाडीनं मारहाण करण्यात आल्याचं म्हटलं. ही घटना १४ जून रोजी घडली. त्यानंतर १६ जूनला दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.कोतवाली देहातचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शंभूनाथ सिंह यांनी दोन आरोपी फरार असून त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं. सत्येंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च जातीतील लोक त्यांच्या जमिनीवरील झाड कापत होते. त्यावेळी त्याचा विरोधकेला असता त्यांना शिवीगाळ आणि जातीवाचक शब्द वापरण्यात आले. त्यानंतर आरोपी विक्रम सिंह ठाकूर आणि सुरेंद्र उर्फ भुरे ठाकूर या दोघांनी मारहाण केली. विक्रम सिंह ठाकूर यानं त्यानंतर गुप्तांगावर कापण्याचा प्रयत्न केल्याचं सत्येंद्र कुमार यांनी म्हटलं.

आरडाओरडा केल्यानंतर चार महिन्यांची गर्भवती घटनास्थळी धावत आली. त्यानंतर भुरे ठाकूरनं तिला देखील कुऱ्हाडीनं मारहाण केली. आम्ही त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पाठलाग केल्याचं कुमार यांनी म्हटलं. त्यानंतर आरोपी घरात घुसले आणि पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप सत्येंद्र कुमार यांनी केला. घरातून जाण्यापूर्वी आरोपींनी पोलिसांना माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
Success Story : भाऊ आणि वडील गेले, कुटुंबावर संकट; पल्लवी बेलदार जिद्दीनं लढल्या, लालपरी चालवत इतिहास रचला
कुमार याची पत्नी पूजा यांनी पोलिसांना संपर्क केला आमची तक्रार घेतली गेली नाही, असं म्हटलं. एफआयआर करण्यासाठी वकिलाशी संपर्क केला. आता आम्ही गावात राहत नसून आरोपींचे नातेवाईक तक्रार मागं घेण्यासाठी धमकी देत आहेत, असं त्या म्हणाल्या.
Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त नजीक, १० जणांची वर्णी, महिलांना संधी?
दरम्यान, डीएसपी विक्रांत द्विवेदी यांनी संत्येंद्र कुमार यांचा दावा चुकीचा असून झटापट झाली त्यामध्ये ते जखमी झाले असून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं.
भाऊ-बहिणीचा ‘सहकार’ पॅटर्न; वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा, उपाध्यक्षपदी धनंजय मुंडेंचा मोहरा

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here