धाराशीव: अवैध गुटखा विक्री करण्यासाठी धाराशीव शहरातील हवालदाराने २५ वर्षीय युवकाकडे १५ हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर १२ हजार रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात हवालदार सापडल्याने एकच खळबळ उडाली.
फ्लेक्स अन् जाहिरातबाजीला ऊत, अजित पवार सत्ताधाऱ्यांवर संतापले, जनतेच्या पैशांवर…
मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांना गुटखा आणि तंबाखूचा व्यवसाय सुरू करायचा होता. तक्रारदारावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आरोपी लोकसेवक हवालदार महादेव वसंतराव शिंदे (४५) यांनी तक्रारदार यांच्याकडे १५,००० रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती १२,००० रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर पंच साक्षीदारासमक्ष लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडली सहा कोटींची रोकड, मोजून अधिकारीही दमले!

हा सापळा विकास राठोड, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशीव यांनी संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद, तसेच विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद, सिद्धराम म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशीव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केला. या सापळा पथकात सिद्धराम म्हेत्रे , पोलीस उपाधीक्षक, विकास राठोड, पोलीस निरीक्षक, पोलीस अमलदार मधुकर जाधव, आशिष पाटील, विशाल डोके यांनी सहभाग नोंदवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here