म. टा. प्रतिनिधी, : गावाकडील घर आणि शेतजमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री भिवंडीतील गुलजारनगरमध्ये घडली. गोळीबारात जखमी झालेल्या या व्यक्तीला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी दोन आरोपींना तात्काळ अटक केली आहे.

अब्दुल सत्तार मोहमद इब्राहिम मन्सुरी (६५, रा. गुलजारनगर) असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे मेडिकल स्टोअर्स, गोदाम आणि लूम कारखाना आहे. मूळचे अलाहाबादचे असलेले मन्सुरी यांच्या गावाकडील १० कोटींच्या मालमत्तेवरून जवळच्या नातेवाइकांशी वाद आहे. गुरुवारी रात्री १०. ३० वाजता मन्सुरी घरी जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. सुदैवाने गोळ्या अंगाला चाटून गेल्याने ते थोडक्यात वाचले. ते या गोळीबारात जखमी झाले असून तातडीने त्यांना ठाण्यातील रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

कट रचून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात आरोपींपैकी अब्दुल रज्जाक मोहमद इब्राहिम मन्सुरी आणि इसरार अहमद यार मोहमद मोमीन या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. जखमी मन्सुरी यांचे आरोपी जवळचे नातेवाइक असून मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. अटक आरोपी कटातले सूत्रधार असून आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजही हाती लागले आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here