पुणे : वेल्हे तालुक्यातील राजगड परिसरात एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहेत. संबधित तरुणीच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १२ जूनला दर्शना आणि तिचा मित्र राहुल हे ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर आले होते. मात्र, तिचा मित्र राहुल हा देखील गायब असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तपासात सीसीटीव्ही बाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांचा मित्रावर संशय अधिक बळावला आहे.

आईला साखरेच्या डब्यात, फरशीवर दिसलं भयंकर, नीट पाहताच लेकीचा डाव कळला; थेट पोलिसांना फोन अन्…
अशात राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला असून दर्शना ही अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रेकिंगला गेलेला मित्र घटनेनंतर फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. राहुल हाच मुख्य आरोपी आहे की आणखी त्या तरुणीला कुणी मारले याचा शोध लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकाविला होता. दर्शना ही सत्कार घेण्यासाठी ९ जून रोजी पुण्यातील स्पॉट लाईट अॅकॅडमी इथं आली होती. ११ जून रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत ती आमच्या संपर्कात होती. मात्र १२ रोजी दर्शनाला आम्ही दिवसभर फोन करत होतो. मात्र, तिने फोन उचलले नाहीत म्हणून आम्ही स्पॉट लाईट अॅकॅडमी इथे आम्ही चौकशीसाठी आलो तेव्हा आम्हाला समजले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र, हे दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. म्हणून त्यांनी सिंहगड रोड पोलिसांत मिसिंगची तक्रार दिली असल्याचे दर्शनाच्या वडीलांकडून सांगण्यात आले होते.

मात्र, शवविच्छेदन अहवालातून तिच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा खून झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता पोलीस कसून तपास करत असून पुढे आणखी काय माहिती उघड होते हे पाहणे महत्त्वाचं आहे.

Mumbai Monsoon 2023: मुंबईकरांसाठी हवामान खात्याकडून Good News, पुढच्या ७२ तासांत मान्सून या भागांत बरसणार

1 COMMENT

  1. Dead – Death – Obituary News : Cause of MPSC Darshana Pawar’s Death: Head and Body Injuries – Celebrities Deaths

    […] […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here