अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून अनैसर्गिक संबंधांचा हव्यास एका इसमाच्या जीवावर बेतला आहे. या इसमाने दारू पाजण्याच्या बहाण्याने सहकाऱ्याला घरी आणत त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र चिडलेल्या सहकाऱ्याने थेट त्याचा गळा चिरून खूनच केला. (Maharashtra Crime News)

अंबरनाथच्या (Ambernath) चिखलोली पाड्यातील मगर चाळीत कृष्णानंद मुनियन राहत होता. तो एमआयडीसीतील एका कंपनीत फॅब्रिकेशनचं काम करत होता. रविवारी रात्री कंपनीतून येताना त्याने कंपनीतील एका सहकाऱ्याला दारू पाजण्याच्या निमित्ताने घरी आणले. दारू पिऊन झाल्यानंतर उशीर झाल्याने आपल्या घरीच मुक्काम करण्यास सांगितलं. यानंतर रात्रीच्या सुमारास कृष्णानंद याने या सहकाऱ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या या सहकाऱ्याने त्याच्याच घरातील चाकू घेऊन कृष्णानंद याचा गळा चिरला आणि तिथून पसार झाला.

दिवसभर विहिरीत ठेवायचे, बाहेर काढून साखळ्यांनी बांधायचे, दारुतून गुंगीचं औषध द्यायचे; धाराशिवमध्ये मानवी तस्करी

सकाळी कृष्णानंदच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनं पाणी भरण्यासाठी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने दार उघडलं नाही. बराच वेळ दार उघडत नसल्यामुळे अखेर आजूबाजूच्यानी दार तोडून घरात प्रवेश केला आणि समोरच कृष्णानंदचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती देताच शिवाजीनगर पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी भाव घेतली. पोलिसांनी तपास करत चक्र फिरवली यानंतर काही वेळातच संशयित आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार कृष्णानंद याने अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याने चिडून त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here