नाशिकः शहरातील त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील हॉटेल संस्कृतीसमोर झालेल्या भीषण अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना १९ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.नामदेव विठ्ठल शिंदे (वय ३६) आणि सुनील मनोहर महाले (वय २६) अशी अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरून भरधाव वेगाने एक कार जात होती. मात्र, अचानक कारचा टायर फुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित झाली आणि कार आपला रस्ता सोडून विरुद्ध दिशेवरुन येणाऱ्या दोन दुचाकींना जाऊन धडकली. कार वेगात असल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली यात दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही गंभीर जखमी असलेल्या युवकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. दरम्यान, अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं बेतलं जीवावर, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने युवकाचा दुर्दैवी अंत

नाशिकमधील त्र्यंबक रोडवर असलेल्या हॉटेल संस्कृती समोर हा भीषण अपघात घडला आहे. या हॉटेल समोर उभा असलेला एक व्यक्ती देखील प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावला आहे. परंतु विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक बसल्याने या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहे.

जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला; दिंडीत सेवा करणाऱ्या वारकऱ्याचा मृत्यू, वारीत हळहळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here