बेंगळुरू: पोलीस कोठडीतून निसटलेला अट्टल पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तुमाकुरू पोलिसांनी ३८ वर्षीय चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. उरलेले अन्न बाहेर फेकून येतो असे सांगून ५ ऑगस्टला तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता.

जी. रंगप्पा उर्फ राजा उर्फ प्रताप असं या अट्टल चोराचं नाव आहे. अंतरसनाहल्ली येथील पुट्टम्मना वटारा येथील तो रहिवासी आहे. चोरीच्या घटनेत त्याला अटक केली होती आणि कोरा पोलीस ठाण्यात त्याला चौकशीसाठी ठेवण्यात आले होते. ५ ऑगस्टच्या रात्री रंगप्पाने जेवण घेतले. उरलेले अन्न बाहेर फेकून येतो असे त्याने पोलीस ठाण्यात तैनात कर्मचाऱ्यांना सांगितले आणि तो बाहेर गेला. पोलीस कर्मचारी त्यावेळी त्याच्यासोबत नव्हते. त्याच्या हातात बेड्याही नव्हत्या. त्याचाच गैरफायदा घेऊन रंगप्पाने पलायन केले. आरोपी पसार झाल्यानंतर पोलीस विभागाने तैनात पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. या प्रकरणी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

पसार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी त्याचे मोबाइल लोकेशन तपासले. मात्र, तो सापडला नाही. अखेर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. रंगप्पाकडे पैसे नव्हते. त्यामुळे पैशांसाठी तो नक्कीच एखाद्या मित्राकडे जाईल असा अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे त्याच्या मित्रांच्या घरी साध्या वेशात पोलिसांना तैनात करण्यात आले. पण तो तिथेही गेला नाही. तो त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी जाईल अशी शक्यता होती. १८ ऑगस्टला रंगप्पा हा त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, २०१५ साली त्याला बसवेश्वरनगर पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये अटक केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here