नवी दिल्ली : दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार राम चरण आणि पत्नी उपासना कमीनेनी यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहेत. राम चरण आणि उपासना यांना कन्यारत्न झाले असून हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताना दिसल्याच्या काही तासांनंतर आज मंगळवार, २० जून रोजी उपासनाने एका गोडस बाळाला जन्म दिला. डिलिव्हरीनंतर आई आणि बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे शेअर करण्यात आली आहे. मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण आणि उपासना कामिनेनी यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली.

काय सांगता! राम चरण- उपासनाच्या घरी येणार ‘मुलगी’ अभिनेत्यानेच चाहत्यांना दिली हिंट
कोण आहे उपासना कमीनेनी?
एकीकडे रॅम चरण दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार आहे, तर उपासना फिल्मी दुनियेशी संबंधित नाही. उपासना कमिनेनी आणि राम चरण यांची एकूण संपत्ती २५००० कोटी रुपये असून स्वतः उपासना एक यशस्वी व्यासायिक महिला आहे आणि तिची एकूण संपत्ती ११३० कोटी रुपये तर राम चरणची एकूण संपत्ती १,३७० कोटी रुपये आहे. एवढंच नाही तर उपासना कमिनेनी एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबाशी संबंधित आहे.

जी-२० मध्ये राम चरण पुन्हा एकदा ‘नाटू-नाटू’वर थिरकला!

उपासनाचे कुटुंब प्रसिद्ध व्यावसायिक
उपासना ही अपोलो हॉस्पिटलचे संस्थापक आणि चेअरपर्सन प्रताप सी रेड्डी यांची नात असून तिचे वडील अनिल कामिनेनी हे KEI ग्रुपचे संस्थापक आहेत. इतकेच नाही तर उपासना अपोलो फाउंडेशनच्या उपाध्यक्षा देखील आहेत. अपोलो हॉस्पिटल आज देशभर रुग्णांची सेवा करत आहेत तर प्रताप रेड्डी यांची एकूण संपत्ती २१,००० कोटी रुपये असून ते भारतातील १०० अब्जाधिशांपैकी आहेत. दरम्यान, अपोलो हॉस्पिटलचे मार्केट कॅप ७०,००० कोटी रुपये आहे. उपासना कामिनेनी अपोलो हॉस्पिटल्सच्या उपाध्यक्षा तर तिची आई शोभना अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्षा आहेत.

लग्नानंतर ११ वर्षांनी राम चरण-उपासना यांच्या घरी आली ‘लक्ष्मी’; सुपरस्टार चिरंजीवी बनले आजोबा
उपासनाचे शिक्षण आणि व्यवसाय
उपासनाने इंटरनॅशनल बिझनेस मार्केटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आणि कौटुंबिक व्यवसायात रूजू झाली. अपोलो हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ पदावर काम करण्यासोबतच उपासना ‘बी पॉझिटिव्ह’ नावाच्या मासिकाच्या मुख्य संपादक देखील आहेत. याशिवाय ती TPA या कौटुंबिक आरोग्य योजना विमा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहे. उपासनाचे वडील अनिल कामिनेनी KEI ग्रुपचे संस्थापक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here