हा ट्रक समृद्धी मार्गाच्या मधोमध असलेल्या पुलाचे कठडे तोडून खाली कोसळला. कठड्याला घर्षण झाल्यामुळे डिझेलची टॅंक फुटून ट्रकने भीषण पेट घेतला. यात दोघांचा भाजून मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा बलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अग्निशामक दल आणि कारंजा शहर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली.
शहर पोलीस स्टेशन कारंजा आणि अग्निशामक दल कारंजा हे घटनास्थळी दाखल झाल्यावर अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आग एवढी भीषण होती की ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. त्यामध्ये असलेले चालक आणि क्लीनर हेही जळून जागी ठार झाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तास लागले. ट्रकला लागलेली आग ही एव्हढी भीषण होती की दोन किमीवरून दुराचे लोट दिसत होते.
त्यावेळी मदतीसाठी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे एपीआय पवार, पीएसआय रेगिवाले, पोलीस कॉन्स्टेबल जावेद मिनीवाले, पवन जाधव, प्रतीक राऊत, महामार्ग सुरक्षा बलाचे संजय बुटे, भूषण अवताडे, बाळकृष्ण सावंत, कारंजा नगर परिषद अग्निशामक दलाचे अधिकारी बाथम, चालक चंदू कटारे, कृष्णा कोकाटे, संकेत अघमे व लोकेशन १०८ समृद्धी महामार्ग रुग्णवाहिका पायलट अतीश चव्हाण, डॉक्टर सोहेल खान,आस-अपातकालीनचे अध्यक्ष रमेश देशमुख यावेळी त्यांनी मदत केली.