म्युच्युअल फंडातून असा बजेट तयार करा!
जर तुम्ही पुढच्या सुट्टीत प्रवास कारण्याचा विचार करत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून ॲडव्हान्समध्ये योजना तयार करू शकता जेणेकरून काही महिन्यांनी किंवा वर्षांनी सुट्टी घेऊ शकता. जर तुम्हाला सुट्टीवर जाण्यासाठी काही महिने शिल्लक आहेत, तर SIP तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. दुसरीकडे, जर तुमची काही वर्षांनी परदेशात प्रवास करण्याची योजना असेल तर तुम्ही हायब्रीड योजनेत गुंतवणूक करू शकता.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा!
तुम्हाला ज्या ठिकाणी प्रवास करायचा असेल त्या ठिकाणच्या खर्चानुसार तुम्ही तुमच्या बजेटमधील खर्चाचा ॲडव्हान्समध्ये अंदाज लावा. जेणेकरून तुम्हाला किती बचत करायची आहे, हे समजून घेणे सोपे होईल. याशिवाय तुम्ही किती मार्केट रिस्क घेऊ शकता याकडेही लक्ष दिले पाहिजे. अशाप्रकारे, योग्य म्युच्युअल फंड योजना निवडून तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी प्रवासाला जाऊ शकता.
तज्ञांचे मत खूप उपयुक्त ठरेल
म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करताना अगोदर लक्षात ठेवा की यामध्ये तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळू शकत नाही. म्हणूनच या संदर्भात गुंतवणूक तज्ञाचा सल्ला घेणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजाराच्या जोखम अंतर्गत येते, म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी त्याशी संबंधित सर्व नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे.