जळगाव : जोडप्यात एकमेकांसोबत राहण्यावरुन झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड अन् फरशी मारली. या मारहाणीत गंभीर दुखापत होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात एरंडोल शहरातील गांधीपुरा भागातील वखार गल्ली येथे सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हर्षदा किरण मराठे (वय २७ वर्ष) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित पती किरण महादू मराठे (वय ३५ वर्ष) याला अटक केली आहे.

एरंडोल शहरातील गांधीपुरा भागात किरण महादू मराठे हा आई, वडील, पत्नी व दोन मुले या परिवारासह वास्तव्यास आहे. किरण हा एरंडोल शहरातील बालाजी ऑईल मिल याठिकाणी मजूर म्हणून काम करतो, व त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून किरणचा पत्नी हर्षदा हिच्यासोबत वेगवेगळ्या कारणांवरून कौटुंबिक वाद होता, सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळून हर्षदा याला किरणकडून घटस्फोट हवा होता, ती त्याच्यासोबत एकत्र राहण्यास तयार नव्हती, मात्र किरणचा घटस्फोट देण्यास नकार होता. हर्षदा हिने सोबतच रहावे यावरुन किरण वाद घालत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

क्षुल्लक कारणाने वाद, रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांची मारहाण, आई-मावशीलाही शिवीगाळ, कुटुंबाचा दावा

गल्लीत दोघांचे कडाक्याचे भांडण

एकमेकांसोबत राहण्याच्या तसेच घटस्फोट देण्याच्या कारणावरुन सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हर्षदाचा पती किरण सोबत वाद झाला. वाद करता करता हर्षदा व किरण हे दोघे घराबाहेर पडले. गल्लीत त्यांचे जोरजोराने भांडण सुरु होते. या वादातून संतापाच्या भरात किरणने हर्षदाच्या डोक्यात कुऱ्हाड तसेच फरशी मारली. यात हर्षदा गंभीर जखमी झाल्या. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पाण्यानेच ‘जीवन’ हिरावलं, आईच्या डोळ्यादेखत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
नागरिकांच्या माध्यमातून घटनेची माहिती एरंडोल पोलिसांना मिळाली. त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीष गोराडे आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हर्षदा हिचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. घटनेची गंभीर दखत घेत पाोलिसांनी संशयित आरोपी पती किरण मराठे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयत हर्षदा हिचे माहेरचे नातेवाईक पवन राजेंद्र मराठे यांच्या फिर्यादीवरुन एरंडोल पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सतीश गोराडे हे करीत आहेत.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

डोळ्यादेखत वडिलांनी आईचा जीव घेतला, दोन्ही मुले सुन्न

मयत हर्षदा हिचे माहेर नंदुरबार जिल्ह्यातील आहे. घटनेची माहिती तिच्या माहेरच्या नातेवाईकांनाही कळविण्यात आली. मात्र नातेवाईक काल सायंकाळपर्यंत न आल्याने रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्कार झाले नव्हते. हर्षदा व किरण या दोघांना ८ वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा अशी दोन मुले आहेत. घटना घडली त्यावेळी दोन्ही मुले सुद्धा याचठिकाणी होती. आपल्या डोळ्यादेखत वडीलांनी आईचा जीव घेतल्याच्या या घटनेने दोन्ही मुले सुन्न झाली आहे. तसेच या घटनेने दोन्ही मुले आईच्या मायेला पोरकी झाली आहेत. तर दुसरीकडे वडील सुद्धा जेलमध्ये गेल्याने वडिलांच्या प्रेमालाही ही मुले मुकणार आहेत. कौटुंबिक वाद अन् क्षणभराचा संताप यामुळे कुटुंब तसेच दोन्ही मुले उघड्यावर आली असून या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here