पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अर्थात MPSC परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणात आता वेगवेगळी माहिती समोर येत आहे. राजगडच्या पायथ्याशी अगदी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. या नंतर तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले आणि तिची आत्महत्या नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालं. कारण, तिच्या शरीरावर आणि डोक्यावर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

१० जूनपासून दर्शनाचा फोन लागलाच नाही…

दर्शनाने परीक्षेत टॉप केल्यामुळे एका संस्थेने तिचा सत्कार करण्याचं ठरवलं आणि १० जूनला हा सत्कार समारंभ पार पडला. एका खासगी संस्थेकडून टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात हा सत्कार झाला. त्याआधी ९ जून रोजी दर्शना एका मैत्रिणीकडे नऱ्हे परिसरात राहण्यासाठी आली होती. या कार्यक्रमानंतर तिचे आई-वडिल १० जूनला तिला फोन करत होते, पण तिचा फोन लागला नाही. त्यानंतर पालकांनी १२ जूनला त्या खासगी संस्थेत चौकशी केली. ती कार्यक्रमानंतर तेथून निघून गेल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं. मुलीचा कुठेच ठावठिकाणा नसल्याने १२ जूनला दर्शनाच्या वडिलांनी सिंहगड पोलीसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

Weather Alert : राज्यात पुढचे ५ दिवस ऊन-पावसाचा खेळ, मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस तर या जिल्ह्यांमध्ये सूर्य कोपणार

या प्रकरणातील सगळ्यात महत्त्वाचा पुरावा….

खरंतर, १२ जून रोजी दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासह राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. दोघेही दुचाकीवरुन तिथं गेले होते. सकाळीच्या १० च्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याचं एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. तेव्हापासून राहुल हांडोरे गायब आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

राहुल हांडोरे नेमका कुठं आहे?

वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता बागवे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या वृत्तानुसार, गायब असलेल्या राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला. पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाले. त्यानंतर कसलिही माहिती न दे त्यानं फोन बंद केला होता. त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं.

Pune Crime: दर्शनाने MPSC गाजवून सत्कार घेतला, मित्रासोबत रायगडावर गेली अन् पुढे…; टॉपर पोरीसोबत काय झालं?
पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाट टीम तयार केल्या आहेत. ९ जूनपासून दर्शना पवारच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. वेल्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी याबाबत माहिती दिली. ती १२ जून रोजी राजगड परिसरात कशी पोहोचली याचा शोध घेण्यात येत आहे.

Crime News: आजीने पूजेसाठी फुलं आणायला पाठवलं, काही वेळात नात रडत-रडत आली घरी; विचारताच कुटुंब हादरलं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here