उल्हासनगर: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केल्याने प्रस्थापितांना त्याची काळजी वाटू लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून घेणे असा मोठा कार्यक्रमच राव यांनी हाती घेतला असून त्यांचे महाराष्ट्रातील दौरेही वाढू लागले आहेत. राव यांना ग्रामीण भागात वाढता प्रभाव आणि मिळणारा प्रतिसाद हा मोठा आहे.

यातच ग्रामीण भागाबरोबर आता शहरातही राव यांचे बॅनर लागल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. ठाणे जिल्हातील उल्हासनगर शहरापाठोपाठ डोंबिवलीतसुद्धा भारत राष्ट्र समितीचे बॅनर लागले आहेत. यावर चंद्रशेखर राव यांचा फोटो असून ‘परिवर्तन की है पुकार, अबकी बार किसान सरकार’ असा आशयसुद्धा लिहिला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे प्रस्थापितांना त्यांच्या या आव्हानाची काळजी वाटू लागली आहे.
BMC News: ठाकरेंच्या आशिर्वादात काम करणाऱ्या गँगचं खरं नाही, ‘या’ मुद्द्यावरून फडणवीसांचा थेट इशारा
पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्या पक्षात घेणं असा कार्यक्रम राव यांनी सुरू केला आहे. यानंतर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातही बीआरएस पक्षाने बॅनरबाजी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली आणि उल्हासनगर शहरात बीआरएस पक्षाचे बॅनर लागले आहेत. डोंबिवली स्टेशन परिसरात हे बॅनर लागले असून उल्हासनगरच्या नेताजी चौकातही बॅनर लावले आहेत. त्यामुळे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात येऊन त्यांना आव्हान दिल्याची चर्चा यानंतर रंगली आहे.

भारत राष्ट्र समितीच्या नागपूरमधील कार्यालयाचे उद्‌घाटन चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले होते. नांदेड, सोलापूर, सांगली, संभाजीनगर नंतर नागपूरमध्ये पक्ष वाढीवर भर देण्यात आला आहे. ठिकठिकाणी पक्ष कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही मंडळींनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. भारत राष्ट्र समितीच्या विस्ताराची प्रारंभी फारशी चर्चा नव्हती. पण अन्य पक्षांमधील नेत्यांचा प्रवेश व पक्ष कार्यालये उघडण्यात येत असल्याने भारत राष्ट्र समितीचे अस्तित्व जाणवू लागले आहे.

नागपुरकरांचा असाही जुगाड; बँकेऐवजी थेट देवाच्या चरणी २००० च्या नोटा; मंदिरातील दानपेटीत अचानक मोठी वाढ

सांगली, सोलापूर, चंद्रपूरसह विविध भागांमध्ये चंद्रशेखर राव यांची मोठी पोस्टर्स लागलेली दिसू लागली आहेत. यातच शहऱी भागात सुद्धा भारत राष्ट्र समितीचे बॅनर आणि त्यावर राव यांचा फोटो झळकू लागले आहेत. ग्रामीण भागाबरोबर आता शहरातही राव यांचे बॅनर लागल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली आणि उल्हासनगर शहरात राव यांचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे भारत राष्ट्र समिती आता शहरी भागात येऊन पोहचली आहे का, असा आता उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here