पाटणा : बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांचे व्याही यांनी राष्ट्रीय जनता दलाला रामराम ठोकत जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासहीत आमदार जयवर्धन यादव आणि फराज फातमी यांनीही जदयूचं सदस्यत्व स्वीकारलं. यामुळे, राजदमध्ये मात्र मोठी खळबळ उडालीय. यानंतर मीडियाशी बोलताना लालू प्रसाद यादव यांचे पुत्र यांनी आपल्या सासऱ्यांवर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिलीय. ‘चंद्रिका रायची माझ्यासमोर उभं राहण्याची ‘ अशा शब्दांत तेजप्रताप यादव यांनी एकप्रकारे आपल्या सासऱ्यांना आव्हानच दिलंय.

‘कोण आहे चंद्रिका राय, फन्द्रिका राय… मला माहीत नाही. हिंमत असेल तर चंद्रिका राय यांनी माझ्या गेटवर यावं. जनतेचं चंद्रिका रायवर नाही तर लालू प्रसाद यादव यांच्यावर प्रेम आहे’ असं म्हणत त्यांनी आपल्या सासऱ्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली.

संबंधित बातमी :

वाचा :

वाचा :

पत्नी यांच्या निवडणूक लढण्याच्या चर्चांवर बोलताना, ‘ज्याला निवडणूक लढायचीय त्यानं लढावी. आम्हाला काहीही देणं घेणं नाही. आमचं प्रकरण अद्याप कोर्टात आहे आणि त्याच वेळी आमचा संबंध संपला होता. ती केसमध्येही प्रत्येक बाजूनं कमकुवत आहे. सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. ती केवळ एक महिला आहे म्हणून आम्ही नारीचा सन्मान करण्याचं काम आम्ही केलंय. नाही तर माझ्याकडे दाखवण्यासाठी अनेक व्हिडिओ क्लिप्स आहेत’ असंही तेजप्रताप यांनी म्हटलंय.

याचसोबत त्यांनी नितीश कुमार सरकारवरही निशाणा साधला. आम्ही कमी पडावं ही नितीश कुमार आणि आरएसएसची सुरूवातीपासूनची इच्छा आहे. पण आम्ही कमकुवत होणार नाही तर आणखी सक्षम होऊन त्यांचा सामना करू, असंही त्यांनी म्हटलंय. सोबत यादव समाजाच्या नेते जदयूच्या संपर्कात असल्याचे दावेही त्यांनी खोडून काढलेत. येत्या चार पाच दिवसांत दुसऱ्या पक्षातून आमच्यासोबत किती लोक येत आहेत, हे कळेल असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलंय.

इतर बातम्या :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here