पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, बनोई येथील एका थांब्यावर ती बसची वाट बघत होती. त्याचवेळी तेथून एक कार जात होती. त्यातील काही व्यक्तींनी लिफ्ट देतो असे सांगून कारमध्ये बसवले आणि सलोल परिसरातील एका फॉर्मवर घेऊन गेले. तिथे त्यांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, फार्महाउसवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर एका हॉटेलातही नेले. तेथेही त्यांनी बलात्कार केला. पोलिसांनी परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
कांगडाचे पोलीस उपअधीक्षक सुनील राणा यांनी सांगितले, की या प्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. ज्या हॉटेलात बलात्काराची घटना घडली, त्या हॉटेलच्या मालकालाही ताब्यात घेतले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.