या हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी चौफेर तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांसमोर पहिले आव्हान होते ते मृताची ओळख पटवणे. त्यासाठी पोलिसांनी खबरी आणि तंत्रज्ञानाची मदत घेतली. काही दिवसांनंतर मृत व्यक्तीची ओळख पटली. त्याचे नाव नीरज महतो असल्याचं समोर आलं. तो खगरिया येथील दरी भदाश गावचा रहिवासी होता. कटिहार पोलीस मृताच्या घरी गेले आणि तेथून समजले की नीरज गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याचं सासर बखरी गावात आहे. त्यानंतर स्टेशन हेड संजय पांडे, ट्रेनी एएसआय राम शंकर कुमार, विकास कुमार दलबलसह बखरी गावात नीरजच्या सासरच्या घरी पोहोचले पण तिथे कोणीच सापडलं नाही.
तपासादरम्यान पोलिसांना दोन महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. पहिली गोष्ट म्हणजे नीरज मानसिकदृष्ट्या कमकुवत होता आणि दुसरं म्हणजे त्याची पत्नी सोनी देवी हिचे खगरिया येथील बखेरा यादवसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होते आणि सासू निर्मला देवी यात त्यांना साथ देत होती. सोनी देवीचा प्रियकर बखेराही येथे आला होता. सासरच्या घरी आलेल्या नीरज महतोला कट रचून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचा खून करण्यात आला. मग पत्नी सोनी, सासू निर्मला, भावजय आणि प्रियकर बखेरा यादव यांनी मृतदेह शेतात नेऊन पुरला.
१३ जून रोजी गवत कापणाऱ्या महिलांना शेतातून एक हात बाहेर येताना दिसला. काही वेळातच ही गोष्ट संपूर्ण परिसरात पसरली आणि स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्परता दाखवत शेतात पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करत गुन्ह्याचा छडा लावला. या घटनेत सहभागी असलेल्या नीरजची पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सोनी देवीचा प्रियकर बखेरा याचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी एसपी जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी मृताची पत्नी सोनी देवी हिला अटक केली आणि त्यांची चौकशी केली तेव्हा तिने खून केल्याचं कबुल केलं. सोनी देवीने सांगितले की, लग्नानंतर तिला तीन मुले आहेत. घरात सर्व काही व्यवस्थित चालले होते. पण, पतीची मानसिक स्थिती बिघडल्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती ढासळली. दरम्यान, ती खगरिया येथील बखेरा यादव यांच्या प्रेमात पडली. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी बखेरा यांनी त्यांना मदत करण्यास सुरुवात केली. पतीची अवस्था पाहून तिने माहेरी बेखरा यादवशी लग्न करण्याबाबत विचारलं. घरातील लोकांनी लग्नाला संमती दिल्यावर तिने पतीची हत्या करण्याचा कट रचला.