बीजिंग: करोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी काही देशांमध्ये सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी त्यातही मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, आता बीजिंगमध्ये मास्कचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. बीजिंगमध्ये नागरिकांना मास्कशिवाय घराबाहेर पडता येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मागील १३ दिवसांपासून शहरात एकही नवा करोनाबाधित आढळला नसल्यामुळे आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. मास्कशिवाय फिरण्याची मुभा दिली असली तरी शुक्रवारी अनेक नागरिक मोठ्या संख्येने मास्क घालून घराबाहेर पडले असल्याचे वृ्त्त ‘राउटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

वाचा:

वाचा:

याबाबत बीजिंगमधील लोकांनी सांगितले की, मास्क घालून घराबाहेर पडल्यामुळे सुरक्षित वाटत होते. तर, काहींनी सामाजिक दबावामुळे मास्क घातले होते. मास्कशिवाय फिरले असते तर लोक मला घाबरून दूर गेले असते अशी प्रतिक्रिया बीजिंगमधील २४ वर्षीय तरुणी काओने यांनी दिली.

बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्कबाबत निर्बंध शिथील करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोनदा लॉकडाउन लागू करून मागे घेतल्यानंतर मास्कचे निर्बंध हटवले होते. बीजिंग महापालिकेच्या आजार नियंत्रण केंद्राने सांगितले की, एप्रिल महिन्याच्या अखेरीस नागरिकांना मास्कशिवाय बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर जून महिन्यात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा मास्क घालणे अनिर्वाय करण्यात आले होते.

वाचा: वाचा:मागील पाच दिवसांपासून बीजिंग, झिनजियांग आणि इतरत्र एकही नवीन करोनाबाधित आढळले नाहीत. स्थानिक प्रशासनाने नियमांची केलेली काटेकोरपणे अंमलबजावणी, मास्क घालणे, घरीच क्वारंटाइन होणे आणि मोठ्या प्रमाणावर चाचणी केल्यामुळे करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले. चीनमध्ये करोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे जवळपास आठ महिन्यात ८४ हजार ९१७ करोनाबाधित नोंदवले गेले आहेत.

दरम्यान, जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. करोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे लस विकसित झाल्यानंतर कोणत्या घटकांना लस देणार, याबाबतही विचार सुरू झाला आहे. अमेरिकेने करोना लशीच्या वापराबाबत मोठे विधान केले आहे. अमेरिकेत करोनाची लस घेणे अनिवार्य करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here