मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे आणि डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज ८० टक्के रुग्णांना करोनाची लक्षणे नाहीत. पण ते या आजाराचे संक्रमण करू शकतात. त्यांच्या माध्यमातून होणारा प्रसार गंभीर बाब असल्याने अशा रुग्णांचे विलगीकरण करणे, त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक असून या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये. करोनाच्या विषाणूला जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत अहोरात्र अविश्रांत मेहनत सुरू ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
करोनाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त, सामाजिक अंतर, मास्कचा वापर, हात धुणे, स्वच्छता राखणे यासारखे उपायच करोनावर सध्याचे औषध असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा यंत्रणेने करोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन केले. तर, करोनाला दूर ठेवूनच हरविणे शक्य आहे. करोना झाल्यानंतर उपचार करून घेण्यापेक्षा तो होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शेवटी सध्याच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना सध्याची अर्थव्यवस्था काहीशी कमकुवत झाली असली तरी सर्वजण मिळून या परिस्थितीवर निश्चित मात करू, असा विश्वास व्यक्त करतानाच गणेशोत्सव साधेपणाने, सुरक्षितपणे साजरा करूया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
सर्वांनी आरोग्याची काळजी घ्याच मात्र जास्तीत जास्त करोना चाचण्या होणे आवश्यक आहे. राज्यातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला आहे, ही बाब समाधानकारक आहे. गरजूंना अधिक चांगली रुग्ण सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे तसेच येणारा गणेशोत्सव शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करीतच साजरा करावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. राज्यात सध्या २८५ शासकीय तर ८४ हजार ३६९ खाजगी कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळा कार्यरत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार माणिकराव जगताप, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी शारदा पोवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे आदी उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I really like and appreciate your blog post.
Thanks so much for the blog post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.