जळगाव: डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आज प्रवेशासाठी शेवटची मुदत होती, मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रवेशसाठी आवश्यक विविध कागदपत्रे मिळण्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी येत होत्या. कागदपत्रे न मिळाल्याने प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ राज्यभरातील डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर आली होती.

मात्र जळगावातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. तसेच विद्यार्थ्यांची अडचण सोडवून मुदत वाढविण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

Lift Collapses in Mumbai: कमला मिलमधील ट्रेड वर्ल्ड इमारतीमध्ये लिफ्ट कोसळली, अपघातात १५ जण जखमी
कागदपत्रे काढण्यात सर्व्हरमुळे विलंब तसेच अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत होता, आज शेवटची मुदत असल्याने डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचति राहण्यासाठी वेळ आली होती. याबाबतची माहिती मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना मिळाल्याने त्यांनी तातडीने फोनवरुन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क साधला, तसेच त्यांना डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत तसेच सर्व्हर डाऊन असल्यामुळे कागदपत्रे मिळण्यास होत असलेल्या अडचणींकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले.

५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, दांडी मारणाऱ्या गुलाबराव पाटलांना ५०० रुपयांचा दंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here