Sai Temple Donation: उन्हाळ्याच्या सुट्टीत साई चरणी भक्तांनी भरभरून दान केले आहे. यात सोने चांदीसह देणगीचा समावेश आहे. मंदिराला एकूण ४७ कोटी रुपयांचे दान प्राप्त झाले आहे, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी दिली आहे.

 

Sai Temple
साई मंदिर

हायलाइट्स:

  • साई मंदिरात भरभरून दान
  • मंदिराला एकूण ४७ कोटी रुपयांचे दान प्राप्त
  • २ किलो सोने आणि ५२ किलो चांदीचा समावेश
शिर्डी : उन्हाळी सुट्टीच्या काळात भाविकांनी साई चरणी भरभरून दान दिले आहे. २५ एप्रिल ते १५ जून या दीड महिन्यांच्या कालावधीत साईबाबा संस्थानला २ किलो सोने आणि ५२ किलो चांदी सह एकूण ४७ कोटी रुपयांचे दान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे लाखो भाविकांनी या दीड महिन्याच्या कालावधीत साई दर्शनाला हजेरी लावली आहे, अशी माहिती बुधवारी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
चुकीची माहिती प्रसारित करणांऱ्याविरोधात साई संस्थान करणार कारवाई, वाचा नेमकं प्रकरण
गेल्या दिड महिन्यात साईभक्तांनी साईबाबा संस्थानला दिलेल्या ४७ कोटी रुपयांच्या दानात देणगी कांऊटरवर २५ कोटी दान दक्षिणापेटीत १० कोटी यासह डेबिट क्रेडिट कार्ड, मनीऑर्डर आणि ऑनलाईन माध्यमातून कोट्यावधींचे दान प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर सव्वा कोटींचे सोने आणि २८ लाखांची चांदीही साईबाबा संस्थानला प्राप्त झाली आहे. ४७ कोटींच्या दानासह साईबाबा संस्थानला दीड महिन्यात सशुल्क आरती आणि सशुल्क दर्शन पासच्या माध्यमातून ११ कोटींचे उत्पन्न देखील मिळाले आहे.

साईभक्ताने दिले २५०० किलो केसर आंब्याचे दान

दरम्यान २२ लाख ४१ हजार भक्तांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला आहे. २१ लाख ९ हजार भक्तांनी मोफत तर ४ लाख २३ भक्तांनी सशुल्क दर्शनाचा आणि ७० हजार ५७८ भक्तांनी सशुल्क आरतीचा लाभ घेतला आहे. साईबाबा संस्थानामध्ये भक्तांनी दिलेल्या दानातून साईबाबा संस्थानच्या वतीने दोन रुग्णालयाच्या माध्यमातुन रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. तसेच साई प्रसादालयात भाविकांना मोफत भोजन दिले जाते. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अशा प्रकारे साई भक्तांच्या देणगीचा वापर साईबाबा संस्थानच्या वतीने केला जातो.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here