नवी मुंबई : नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा शाळेने एसएससी बोर्डमधून थेट सीबीएई बोर्डमध्ये विद्यार्थ्यांना स्थलांतरील केल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आणि शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन केले. ह्या आंदोलनाला मनसे विद्यार्थी सेनेने पाठींबा दिला आहे. अनेक वर्ष मराठी माध्यमाच्या असलेल्या या शाळेत मराठी माध्यम बंद करून शाळा पूर्णतः सीबीएसई बोर्डाची करण्याचा डाव आहे. त्यामुळे मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या पालकांनी मराठी माध्यमच सुरू ठेवण्यासाठी शाळेबाहेर आंदोलन केले.

मराठी राजभाषा वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचे डाव रचले जात आहेत. आणि नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा शाळेने असाच प्रकार केल्याचे समोर आले आहे. या शाळेत राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अचानक सीबीएसई बोर्डाच्या शिक्षणात वर्ग केल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.

नवी मुंबई पालिकेच्या सीबीएसई शाळेची व्यथा; पुरेशा शिक्षकांअभावी एक दिवसाआड भरतोय वर्ग
शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे फॅड आले असले तरी अजूनही अनेकांची मुले ही मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. आपली मराठी भाषा विसरता कामा नये किंवा आपल्या मुलाला मराठी आलीच पाहिजे या हेतूने अनेक पालक अजूनही मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देत असल्याचे पाहायला मिळतात. मराठी माध्यम शाळेमध्ये मराठी बरोबर इंग्रजीही शिकता येते. त्यामुळे मुलांना दोन्ही भाषा अवगत राहतात. मात्र, इंग्रजी माध्यमामध्ये तसे नसून फक्त एकाच भाषेचे ज्ञान मिळते आणि मराठी भाषा लोप पावत जाते. तसेच विशेष म्हणजे या शाळेत आर्थिक दुर्बल घटकातील आरटीई अंतर्गत मराठी माध्यमासाठी प्रवेश निश्चित असताना ज्ञानपुष्प विद्यालय प्रशासनाकडून मराठी माध्यमात प्रवेश न देता सीबीएसई माध्यमालाच प्रवेश घ्या, असा तगादा लावला जात आहे. त्यामुळे शाळेविरोधात पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. यामुळे पालकांनी सकाळी शाळेसमोर आंदोलन केले. या आंदोलनाला मनसे विद्यार्थी सेनेने पाठिंबा दिला आणि मोर्चात सहभागी झाले. याबाबत ज्ञानपुष्पा शाळेशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

पहिल्याच दिवशी ‘रयत’ची शाळा भरली छतावर; धोकादायक शाळेचे स्थलांतर बाजार समितीच्या इमारतीत
राज्य माध्यमिक शिक्षण बोर्डात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना पूर्व सूचना न देता बळजबरीने सीबीएसई बोर्ड स्थलांतरित करण्यास भाग पाडणे अन्यायच ठरतो. त्यामुळे शाळा प्रशासनाने आपला निर्णय मागे न घेतल्यास मनसे विद्यार्थी सेने मार्फत अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– योगेश शेटे, उपशहर अध्यक्ष, मनसे

नवी मुंबईत आशियातील सर्वात मोठा कॅट शो; ३०० ते ३५० मांजर प्रजातींचा समावेश


राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात एसएससी बोर्डातून थेट सीबीएससी बोर्डात विद्यार्थ्यांना स्थलांतरित करणे नियमबाह्य आहे. सदर प्रकाराबाबत नवी मुंबई आयुक्त यांच्या आदेशानुसार गुरुवारी दुपारी सीबीडी येथील ज्ञानपुष्पा विद्यानिकेतन संस्था चालक यांच्याशी संस्थांच्या दानलात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
– अरुणा यादव, शिक्षण अधिकारी नवी मुंबई, शिक्षण विभाग मनपा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here