तेहरान: शुक्रवारी दोन नवीन क्षेपणास्त्रांची चाचणी केली. ही क्षेपणास्त्रे १४०० किमी अंतरावर मारा करण्यास सक्षम आहे. इराणने एका क्षेपणास्त्राचे नाव अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झालेले कमांडर शहीद कासिम सुलेमानी ठेवले आहे. तर, दुसरे क्रूज क्षेपणास्त्राचे नाव शहीद अबू महदी ठेवले आहे. इराणच्या नौदलात समावेश होणारे क्षेपणास्त्र १००० किमी अंतरावर मारा करण्यास सक्षम आहे.

कमांडर कासिम सुलेमानी आणि अबू महदी हे दोघेही जानेवारी महिन्यात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात ठार झाले होते. त्यावेळी हे दोघेही इराकमध्ये होते. या हल्ल्यानंतर इराण आणि अमेरिकेत तणाव वाढला आहे. इराण आता दोन नवीन क्षेपणास्त्रांची चाचणी करून अमेरिका आणि इस्रायल, सौदी अरेबिया आणि युएईला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. इराणचे संरक्षण मंत्री अमीर हातमी यांनी या दोन्ही क्षेपणास्त्रांच्या चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती दिली.

वाचा:

या क्षेपणास्त्र चाचणीचे छायाचित्रे इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आली. या क्षेपणास्त्रांमुळे इराणच्या संरक्षण क्षमतेत वाढ झाली असल्याचे सरकारने म्हटले आहे. राष्ट्रपती हसन रुहानी यांनी सांगितले की, आमच्यासाठी ही दोन्ही क्षेपणास्त्रे विशेषत: क्रूझ क्षेपणास्त्रे अतिशय महत्त्वाची आहेत. दोन वर्षाच्या आतच या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ही ३०० किमी अंतरावरून १००० किमी इतकी करण्यात आली आहे. इराणची लष्करी ताकद आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम हा कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी नव्हे तर आत्मरक्षण करण्यासाठी आहे.

वाचा:

वाचा:

इराणवर पुन्हा शस्त्र निर्बंध लावावेत यासाठी अमेरिकेने पु्न्हा एकदा संयुक्त राष्ट्र संघात धाव घेतली आहे. येत्या काही महिन्यात इराणवरील निर्बंध संपुष्टात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच निर्बंध वाढवण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषदेत फेटाळण्यात आला होता.

वाचा:

तर, दुसरीकडे इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये मैत्री करार झाला आहे. मागील अनेक वर्षांपासूनचे शत्रुत्व विसरून दोन्ही देश एकत्र आले आहेत. मात्र, इराणला शह देण्यासाठी आणि इराणकडून होणाऱ्या संभाव्य त्रासापासून वाचण्यासाठी हे देश एकत्र आले असल्याची चर्चा आहे. पॅलेस्टाइनच्या मुद्यावर युएईने धोका दिला असल्याची टीका इराणने या करारानंतर केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here