सोने-चांदी आजचा प्रतितोळा दर
देशांतर्गत वायदे बाजारात एकीकडे सोने-चांदी आजही स्वस्त झाले आहे तर सराफा बाजारातही शुद्ध सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६० हजार रुपयांच्या खाली पडले आहेत. गुडरिटर्न्सनुसार,२२ कॅरेट सोन्यात आज २२ जून रोजी २०० रुपयांची घसरण झाली आणि किमती ५४ हजार ५०० रुपयांवर आल्या आहेत. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ६० हजार प्रतितोळ्याच्या खाली आपटल्या आहेत. २२ कॅरेट सोने २२० रुपयांनी स्वस्त होऊन त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५९,४५० रुपये झाल्या आहेत. काल हा भाव अनुक्रमे ५४,७०० रुपये आणि ५९,६७० रुपये होता.
MCX वरही सोने-चांदी स्वस्त
सलग तीन दिवस भारतीय बाजारपेठेत संमिश्र ट्रेंड पाहिल्यानंतर गुरुवार, २२ जून रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आज घसरण नोंदवली गेली. MCX वर ऑगस्ट सोन्याचे फ्युचर्स कालच्या बंदच्या तुलनेत ८६ रुपये किंवा ०.१५% घसरून ५९,६२८ रुपये प्रति १० ग्रॅम झाले असून चांदीचा वायदा ०.६५% किंवा ४५२ रुपयांनी घसरून ६८,७९५ रुपये प्रतिकिलो झाला. उत्पादन शुल्क, मेकिंग चार्जेस आणि राज्य कर यासारख्या काही मापदंडांच्या आधारावर देशातील वेगवेगळ्या प्रदेशांसाठी सोन्याची किंमत दररोज बदलते.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचा भाव
यूएस फेडरल रिझव्र्हने या वर्षी व्याजदरात वाढ करण्याच्या चर्चेने गुरूवारी सोन्याच्या भावात किंचित बदल झाला, मागील सत्रातील सराफा तीन महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोचला, अशी बातमी रॉयटर्सने दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात, कोमेक्स सोन्याचा भाव प्रति औंस $१,९४३.५ वर गेला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव सपाट राहिला आणि प्रति औंस $१,९३२.२ वर व्यवहार करत होता.