मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह औरंगजेबाचा फोटो असलेले पोस्टर लावल्याने खळबळ उडाली. मुंबईतील माहिम परिसरात असलेल्या केसरी टूर्स ऑफिसच्या समोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे बॅनर झळकवण्यात आले. मात्र पोलिसांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हे पोस्टर तात्काळ हटवले. परंतु हा खोडसाळपणा कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

माहिममध्ये उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर-औरंगजेब यांचे फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले. “औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे” असा एकेरी भाषेतील आशय या पोस्टरवर होता. ‘शिवरायांची जनता’ असं खाली लिहिण्यात आलं आहे. तर #UddhavThackerayForAurangzeb अर्थात औरंगजेबासाठी उद्धव ठाकरे असा हॅशटॅग बॅनरवर खाली छापण्यात आला आहे. या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुंबईतील माहिम भागातील केसरी टूर्स ऑफिससमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे बॅनर लावल्याची माहिती आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी पोलिसांनी काढून टाकलं. नेमके कोणी हे पोस्टर लावले याचा शोध सुरु आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा दुसऱ्या पक्षात प्रवेश; राष्ट्रवादी सोडून गाठलं हैदराबाद

नेमकं प्रकरण काय?

प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडच्या काळात राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन सातत्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबडेकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन नवा वाद ओढावून घेतल्याची चर्चा होती.

Ajit Pawar: अजित पवारांना राग का आला, सर्वांदेखत जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदाचे महिने का मोजून दाखवले?
दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्व आक्षेप फेटाळून लावत औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्या संघटनांना सडेतोड शब्दांमध्ये फटकारले. मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली असे म्हणता येईल. या स्थळावर शेवटी लोकांची श्रद्धा आहे, आपली श्रद्धा आहे की नाही, हा वेगळा भाग आहे. ज्याला मानायचं आहे, त्यांनी मानावं, ज्यांना नाही मानायचं त्यांनी मानू नये. पण मानणाऱ्या आणि न मानणाऱ्यांनी एकमेकांचा अपमान करु नये. लोकांच्या या श्रद्धेचा मान आपण राखला पाहिजे, त्याचा आदर झाला पाहिजे. सरकारनेही या श्रद्धेचा अपमान करु नये, असे आम्हाला वाटत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते.

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन महिमामंडन करणं उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? | देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युती असल्यामुळे औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन भाजप, शिंदे गट यांनी ठाकरेंवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here