पुणे : सहकार नगर परिसरात वाहनं फोडल्याची घटना ताजी असताना, सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चक्क रस्त्यामध्ये कार लावून आणि कारच्या छतावर बसून तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना काल फाइव्ह स्टार सोसायटीतील गणपती मंदिर समोर चौकात रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी तलवारीने केक कापणाऱ्या तरुणासोबत त्याच्या चार मित्रांना अटक केली आहे.

हर्ष आनंद कदम (वय १९, रा. श्री साई पार्क अपार्टमेंट त्रिमूर्ती चौक धनकवडी), सनी सुभाष दीपक (वय २८, रा. फाइव्ह स्टार सोसायटी धनकवडी) सोबत दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.

ठाकरे-प्रकाश आंबेडकरांसोबत औरंगजेबाचा फोटो, पोस्टरवरील ओळींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर हद्दीतील फाइव्ह स्टार सोसायटी समोर गणपती मंदिरासमोर हर्ष कदम याच्या वाढदिवसानिमित्त तो आणि त्याचे मित्र चौकात कार लावून कारच्या छतावर बसून धारधार तलवारीने केक कापत आहे. त्याच्यासोबत वाढदिवसानिमित्त आलेल्या त्याचे अनेक मित्र देखील चौकात मोठा धिंगाणा घालत आहे. यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं असून, स्थानिकांनी याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी रात्रीच घटनेची दखल घेत सहकारनगर पोलीस कर्मचारी नवनाथ शिंदे, सह इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ज्याचा वाढदिवस साजरा केला जात होता तो हर्ष कदम आणि त्याचे इतर मित्रांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केला असून पुढील कारवाई सहकारनगर पोलीस करत आहे.

MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरण, मित्र राहुल हंडोरेला मुंबईत अटक, खुनाचे धक्कादायक कारण समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here