श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा परत घेण्याबाबत आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही संकेत देण्यात आले नाहीत. आता भारत सरकारवर कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही. एक देखील दिवस असा नाही, जेव्हा ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) खोटे बोलत नाहीत.

केंद्र सरकारचे हे पाऊल अनपेक्षित अनपेक्षित होते, असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, ‘एक दिवसापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी मात्र राज्याचा दर्जा काढून घेण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात जवान पाठवण्यात आले आहेत, त्याची गरज काय आहे, असे मी पंतप्रधानांना विचारले. पर्यटकांनाही जम्मू आणि काश्मीरमधून बाहेर काढण्यात येत होते. अमरनाथ यात्रा देखील रद्द करण्यात आली होती. हे सगळे विचित्रच होते… जसे पाकिस्तानविरुद्ध युद्ध किंवा दुसरे काही तरी. आम्ही पंतप्रधानांना विचारले, मात्र त्यांनी त्यावर काहीएक म्हटले नाही. त्यांनी आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या.’

तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सांगायचे आहे, असे फारूख अब्दुल्ला यांनी विचारण्यात आले. त्या वेळी ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी प्रामाणिक व्हावे आणि त्यांनी सत्याला सामोरे जावे अशी मी त्यांना विनंती करेन… कोणीही आता सरकारवर विश्वास ठेवू शकणार नाही. हे अशक्य आहे… ते खोटे बोलत नाहीत, असा एकही दिवस नाही.’

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर या राज्याचा विशेष दर्जा समाप्त केला. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्र शासित प्रदेश करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-

मला ताब्यात घेण्यात आल्याचे कळल्यावर मला धक्काच बसला असे एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत फारूख अब्दुल्ला म्हणाले. आम्ही नेहमीच देशासोबत उभे राहिलो. जे माझ्यासोबत घडले त्याची मी कल्पना देखील केली नव्हती, अशा शब्दात फारूख अब्दुल्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here