मुंबई: मुंबईतील करोना रुग्णांची संख्या पाहता महापालिकेने रुग्णाला करण्याबाबतच्या नियमात बदल केला आहे. त्यानुसार महापालिका आता कोविडची लक्षणे नसलेल्या आणि दीर्घकालीन आजार असलेल्या ५० वर्षीय रुग्णांना घरात करणार नाही. या रुग्णांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे.

कोविड बाधित रुग्णांतील ५० ते ६० वर्ष वयोगटामध्ये मृत्युचे प्रमाण इतर वयोगटाच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळल्यानंतर, त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने, गृह विलगीकरण बाबतच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांसह अतिरिक्त सूचना म्हणून त्यांचे महानगरपालिका प्रशासनाकडून पालन/अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईतील सध्याच्या गृह विलगीकरण मार्गदर्शक सुचनांनुसार, ज्या कोविड रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असतील, ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल आणि इतर कोणतेही दीर्घकालीन आजार नसतील व स्वतंत्र प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध असेल, अशा रुग्णांचे गृह विलगीकरण करण्यात येते. मात्र, कोविड-१९ विषयक सांख्‍यिकी विश्लेषणातून असे निदर्शनास आले आहे की, वय वर्ष ५० ते ६० या वयोगटामध्ये मृत्युंचे प्रमाण अधिक आहे, त्यांच्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार हे बदल करण्यात आल्याचं पालिकेने म्हटलं आहे.

विलगीकरणाचे नवे नियम
>> लक्षणे नसलेले कोविड बाधित, ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असेल आणि त्यांना दीर्घकालीन स्वरुपाचे आजार असतील, तर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्य हिताच्या दृष्टिने त्यांनी गृह विलगीकरणात राहण्यासाठी आग्रह धरु नये, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल. अशा रुग्णांना कोरोना काळजी केंद्र-२/ समर्पित कोरोना आरोग्य केंद्र/ शासकीय किंवा खासगी समर्पित कोरोना रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या गरजेनुसार दाखल करण्यात येईल. याव्यतिरिक्त, लक्षणे नसलेल्या कोविड बाधितांना दीर्घकालीन आजार नसल्यास, त्यांना गृह विलगीकरणाचा पर्याय देण्यात येईल.

>> केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये रुग्ण आढळून आल्यास, घनकचरा व्‍यवस्थापन विभागाकडून किमान एकदा निर्जंतुकीकरण करण्यात येईल. तसेच संबंधित कोविड बाधित रुग्णाचे घर आणि सामुदायिक वापराच्या जागांचेही निर्जंतुकीकरण करण्यात येईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here