मुझफ्फरपूर: बिहारमधील (Bihar) मुझफ्फरपूरमध्ये सरकारी घोटाळ्याचे एक धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. मुझफ्फरपूरमधील एका ६५ वर्षीय महिलेने फक्त १४ महिन्यांत ८ मुलींना जन्म दिला आहे. वैद्यकीय शास्त्रासाठी (Medical Science) ही अशक्य गोष्ट आहे. मात्र, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या () आड लपून या प्रकाराला कागदावर मात्र सत्य असल्याचे दाखवण्यात आला आहे. हा संपूर्ण खेळ मुली जन्माला आल्यानंतर मिळणाऱ्या प्रोत्साहनपर रक्कम हडप करण्यासाठीचा आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण जिल्ह्यातील मुशहरी प्रखंडातील आहे. ही रक्कम जमा करण्यासाठी दलालांनी कार्यालयात सादर केलेले दस्तावेज आश्चर्यकारक आहेत. त्या दस्तावेजानुसार, एका ६५ वर्षीय महिलेने केवळ १४ महिन्यांमध्ये एकूण ८ मुलींना जन्म दिला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी आणि बँकचे सीएसपी या आधारहीन दस्तावेजांच्या आधारे एका ज्येष्ठ महिलेला प्रोत्साहनपर रक्कम पाठवत राहिले. ज्या महिलांची नावे, पत्ते आणि अकाउंटचा वापर करण्यात आला त्या महिलांना मात्र याची काहीएक कल्पना नाही. या घोटाळ्यात मुशहरी पीएसचीचे अनेक कर्मचारी संबंधित असल्याचे स्पष्ट होत आहे.

६५ वर्षीय लीलादेवी यांनी १४ महिन्यात दिला ८ मुलींना जन्म

मुशहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी उपेंद्र चौधरी यांनी या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात या घोटाळ्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतरच हे प्रकरण उघड झाले. या प्रकारावर विश्वास ठेववत नाही, असे हे प्रकरण असल्याचे चौधरी म्हणाले. वय ६५ वर्षीय असताना लीलादेवी यांनी १४ महिन्यात ८ मुलींना जन्म दिल्याचे कागदपत्रांमधअये दाखवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना प्रत्येक प्रसूतीसाठी सरकारकडून मिळणारी प्रोत्साहनपर रक्कम पाठण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रत्येक तथाकथित प्रसूतीसाठी १,४०० रुपये लीलादेवी यांच्या तथाकथित बँकेच्या खात्यात वळती करण्यात आली आणि लाभार्थीद्वारे पैसे काढण्यात आल्याचेही दिसत आहे.

सोनिया देवी यांनी ५ महिन्यात दिला ४ मुलींना जन्म

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे रेकॉर्ड मान्य केल्यास शांतीदेवी यांनी ९ महिन्यांत ५ मुलींना जन्म दिला, सोनियादेवी यांनी ५ महिन्यांत ४ मुलींना जन्म दिला आहे. या प्रकरणी जेव्हा या महिलांशी बातचित करण्यात आली, तेव्हा त्या घाबरल्या. आपले वय आणि आपल्या मुलांचे वय सांगत त्यांनी सांगितले की आमच्या मुलांचे जन्म होऊन दशकांचा काळ लोटला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

प्रथमदर्शनी आरोपात तथ्य असल्याचे स्पष्ट

जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी या अनियमिततेची गंभीरपणे दखल घेत या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. प्रथमदर्शनी या आरोपात तथ्य असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीला आढळले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here